स्पर्धेत टिकण्यासाठी सरकारने बीएसएनएलची ४ जी व ५ जी सेवा सुरू करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:17 IST2021-07-29T04:17:18+5:302021-07-29T04:17:18+5:30
बीएसएनएलच्या ऑल युनियन असोसिएशन आणि जळगाव जिल्हा बीएसएनएल एम्प्लॉइज युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने हे उपोषण करण्यात आले. यावेळी नीलेश ...

स्पर्धेत टिकण्यासाठी सरकारने बीएसएनएलची ४ जी व ५ जी सेवा सुरू करावी
बीएसएनएलच्या ऑल युनियन असोसिएशन आणि जळगाव जिल्हा बीएसएनएल एम्प्लॉइज युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने हे उपोषण करण्यात आले. यावेळी नीलेश काळे, सी. डी. पाटील, आर. एन. पाटील, शशिकांत सोनवणे, एम.डी. बढे, बी. पी. सैदाणे, प्रदीप चांगरे, चेतन जाधव, अजय वाघोदे, विकास बोंडे, एन. एस. नेहेते, श्रवण कासार आदी कर्मचाऱ्यांनी उपोषणात सहभाग घेऊन सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
इन्फो :
या आहेत प्रमुख मागण्या :
- बीएसएनएल ची ४ जी सेवा त्वरित सुरू करून ५ जी सेवेची तयारी करावी.
- ग्राहकांना वेगवान व अखंडित सेवा देण्यासाठी नेटवर्क मजबूत करावे.
- कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर करा
- बीएसएनएलचे ‘डीओटी’कडे असलेले ३९ हजार कोटी परत करा.
- बीएसएनएल कर्मचाऱ्यांना तिसरा वेतन करार त्वरित लागू करा.
- थेट भरती कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचे ३० % लाभ द्या.
-बीएसएनएलचे टॉवर व फायबरचे जाळे विकू नका.
-एफटीटीएचच्या सेवेच्या दर्जात सुधारणा करा.
-कुचकामी ठरलेल्या ठेकेदारीचा पुनर्रविचार करा.