केंद्रप्रमुखांना करावे लागणार आवास योजनेचे सव्रेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 18:45 IST2017-09-11T18:38:43+5:302017-09-11T18:45:20+5:30

अमळनेर पंचायत समितीतील अजब प्रकारामुळे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राला ‘खो’

Survey of housing scheme to be done by the Center | केंद्रप्रमुखांना करावे लागणार आवास योजनेचे सव्रेक्षण

केंद्रप्रमुखांना करावे लागणार आवास योजनेचे सव्रेक्षण

ठळक मुद्देकेंद्रप्रमुखांना करावे लागणार घरोघर सव्रेक्षणपंचायत समितीला सादर करावा लागणार अहवालप्रगत शैक्षणिक महाराष्ट्राच्या उद्देशाला खो

ऑनलाईन लोकमत

अमळनेर,दि.11 - शिक्षण क्षेत्रातील केंद्रप्रमुखाना प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थी याद्यांचा सव्रेक्षण करण्याचे आदेश देण्याचा अजब प्रकार अमळनेर पंचायत समितीने केला आहे. यामुळे महाराष्ट्र ख:या अर्थाने शैक्षणिक प्रगत होईल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. चाचणी परीक्षा होऊनही अनेक शाळांना पुरेशी पुस्तके मिळाली नाहीत. पायाभूत आणि नैदानिक चाचणी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकाही अपूर्ण आल्याने काही शाळांना स्वखर्चाने ङोरॉक्स कराव्या लागल्या. त्यामुळे प्रश्नपत्रिका फुटल्याचे प्रकारही उघडकीस आले. याकडे अधिकारी मात्र सोयीस्कर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे. या सा:यात भर म्हणून की काय अमळनेर पंचायत समितीने केंद्रप्रमुखांना प्रधानमंत्री आवास योजनेचा सव्रेक्षण करण्याचे आदेश दिले आहे. केंद्रप्रमुखाना यादीप्रमाणे घरोघरी जाऊन घरमालक, बेघर, त्याùच्याकडे टीव्ही , मोटारसायकल आदी वस्तू आहेत का? याची नोंद करून पंचायत समितीला अहवाल सादर करावा लागणार आहे. परिणामी त्यांचे मूळचे शिक्षण कर्तव्य सोडून इतरत्र लक्ष द्यावे लागणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेचे काम देखील शासनाचे काम आहे. केंद्रप्रमुख पंचायत समितीचे कर्मचारी आहेत. म्हणून त्यांना आवास योजनेचे काम देण्यात आले आहे - अशोक पटाईत, गटविकास अधिकारी, अमळनेर.

Web Title: Survey of housing scheme to be done by the Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.