अतिक्रमण काढण्यासाठी सत्ताधारी नगरसेवकांकडून आयुक्तांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:41 IST2020-12-17T04:41:58+5:302020-12-17T04:41:58+5:30

जळगाव : शहरातील गणेश कॉलनी मार्गावर खाजॉंमिया दर्ग्यासमोर भररस्त्यात उभारलेल्या अतिक्रमित चौथऱ्याचे अतिक्रमण वाहतुकीला अडथळा ठरत आहे. अनेकवेळा मागणी ...

Surrounding the commissioner by the ruling corporators to remove the encroachment | अतिक्रमण काढण्यासाठी सत्ताधारी नगरसेवकांकडून आयुक्तांना घेराव

अतिक्रमण काढण्यासाठी सत्ताधारी नगरसेवकांकडून आयुक्तांना घेराव

जळगाव : शहरातील गणेश कॉलनी मार्गावर खाजॉंमिया दर्ग्यासमोर भररस्त्यात उभारलेल्या अतिक्रमित चौथऱ्याचे अतिक्रमण वाहतुकीला अडथळा ठरत आहे. अनेकवेळा मागणी करूनही अतिक्रमण काढण्यात येत नसल्याने बुधवारी भाजपच्या नगरसेविका दीपमाला काळे, भाजपचे इतर नगरसेवक यांच्यासह परिसरातील नागरिकांनी बुधवारी महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर निदर्शने करीत आयुक्त सतीश कुलकर्णी यांना घेराव घातला. यावेळी सर्व आंदोलकांनी काळ्या फिती लावून मनपा प्रशासनाचा निषेध देखील व्यक्त केला.

संतप्त नगरसेवक व नागरिकांनी महासभा सुरू होण्यापूर्वी सतरा मजली इमारतीच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन केले. यावेळी ढोल वाजवून प्रशासनाच्या अकार्यक्षमतेचा निषेध देखील करण्यात आला. तसेच आयुक्तांच्या अंगावर पुष्पवृष्टी करत त्यांचे आगळे-वेगळे स्वागत देखील नगरसेवकांनी केले. दरम्यान, कारवाई करण्यासाठी नगरसेवकांनी मनपा प्रशासनाला सात दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. कारवाई न झाल्यास अतिक्रमणस्थळी आंदोलनाचा इशारा नगरसेवक व या भागातील नागरिकांनी दिला आहे.

Web Title: Surrounding the commissioner by the ruling corporators to remove the encroachment