शांततेच्या समोर शस्त्राचीही शरणागती

By Admin | Updated: September 21, 2015 00:34 IST2015-09-21T00:34:16+5:302015-09-21T00:34:16+5:30

शांततेच्या काळात हिंसक वातावरण अभावाने असते.

Surrender of weapons in front of peace | शांततेच्या समोर शस्त्राचीही शरणागती

शांततेच्या समोर शस्त्राचीही शरणागती

शांततेच्या काळात हिंसक वातावरण अभावाने असते. शांती माणसाला सौख्याचे वरदान बहाल करते. त्याच्या प्रगतीला हातभार लावते. जगात शांतता नांदावी यासाठी संयुक्त राष्ट्र संघाच्या वतीने जागतिक शांतीदिनाचा प्रारंभ 1981 साली करण्यात आला. 21 सप्टेंबर रोजी जगात शांतीदिन पाळला जातो. सर्व जगाला शांतीचा संदेश देण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने हा दिवस निवडलेला आहे. जगभरातील सर्व राजकीय पक्ष, लष्कर खाते, आम जनता हा दिवस गौरवाने पाळतात.

या दिवसाची सुरुवात होते तेव्हा संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्यालयात शांती-घंटा घणाणते. ही घंटा विविध देशातील मुलांनी दान केलेल्या नाण्यांपासून तयार करण्यात आली आहे. ही घंटा जपानने भेट दिली आहे व विविध युद्धांमध्ये झालेल्या जीवितहानीचे स्मरण ती सर्वाना करीत राहते. तिच्या पृष्ठभागावर जागतिक शांती चिरायू होवो’, अशी अक्षरे कोरलेली आहेत. 1981 साली संयुक्त राष्ट्र संघाच्या सर्वसाधारण सभेत संमत झालेल्या ठरावानुसार सप्टेंबर महिन्यात तिसरा मंगळवार शांतीदिन म्हणून घोषित करण्यात आला होता. 21 सप्टेंबर, 1982 हा प्रथम आंतरराष्ट्रीय शांतीदिन ठरला. 2001 साली, या ठरावात बदल करून सप्टेंबरचा तिसरा मंगळवार न धरता, 21 सप्टेंबर ह्या दिवसावर शांतीदिन म्हणून शिक्कामोर्तब झाले. महात्मा गांधींनी अहिंसक मागार्ने, शांततापूर्वक सत्याग्रहाची चळवळ उभारली होती, तेव्हा शस्त्राला शांतीपुढे शरणागती पत्करावी लागली होती. देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर बंधुत्वाची भावना फैलावून, युद्धे रोखण्याचे महान कार्य करणा:या तसेच सामाजिक बांधिलकीच्या कार्यास वाहून घेणा:या विभूतींना शांतीचे नोबल पारितोषिक हा अत्युच्च पुरस्कार बहाल केला जातो.

Web Title: Surrender of weapons in front of peace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.