जळगावचा सराईत गुन्हेगार सुरेश ठाकरेला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 23:21 IST2018-02-06T23:20:49+5:302018-02-06T23:21:35+5:30
पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेल्या सुरेश पुंडलिक ठाकरे (रा.कोळी पेठ, जळगाव) याला मंगळवारी शनी पेठ पोलिसांनी अटक केली. २००६ मधील खंडणीच्या गुन्ह्यात न्यायालयात सुरु असलेल्या तारखेवर हजर राहत नसल्याने न्यायालयाने ठाकरे याच्याविरुध्द अटक वारंट काढले होते. पोलिसांनी त्याला दुपारी अटक करुन न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केली.

जळगावचा सराईत गुन्हेगार सुरेश ठाकरेला अटक
ठळक मुद्दे न्यायालयाने काढले अटक वारंटखंडणीच्या गुन्ह्याचे प्रकरणतारखेवर सतत गैरहजर
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,६ : पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेल्या सुरेश पुंडलिक ठाकरे (रा.कोळी पेठ, जळगाव) याला मंगळवारी शनी पेठ पोलिसांनी अटक केली. २००६ मधील खंडणीच्या गुन्ह्यात न्यायालयात सुरु असलेल्या तारखेवर हजर राहत नसल्याने न्यायालयाने ठाकरे याच्याविरुध्द अटक वारंट काढले होते. पोलिसांनी त्याला दुपारी अटक करुन न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केली.