शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ब्रेकिंग : जळगाव घरकुल घोटाळ्याप्रकरणी माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्यासह 48 जण दोषी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2019 14:08 IST

जळगाव घरकुल घोटाळ्याप्रकरणी सुरेशदादा जैन, प्रदीप रायसोनी यांच्यासह 48 आरोपींना धुळे न्यायालयाने दोषी ठरवले आहे.

जळगाव/धुळे - राज्यातील राजकारणात गाजलेल्या जळगाव घरकुल घोटाळ्याप्रकरणी माजी सुरेशदादा जैन, प्रदीप रायसोनी यांच्यासह 48 आरोपींना धुळे न्यायालयाने दोषी ठरवले आहे. सर्व आरोपींना ताब्यात घेण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहे.  दरम्यान, आज दुपारी धुळेन्यायालयामध्ये सर्व आरोपींना शिक्षा सुनावण्यात येईल. 

दरम्यान, आज झालेल्या सुनावणी वेळी आरोपींच्या वकिलांनी आरोपींचे वय विचारात घेण्याची तसेच ते काही सराईत गुन्हेगार नसून अनावधानाने चूक झाल्याचा युक्तिवात न्यायालयासमोर केला. आता दुपारी न्यायालय आरोपींना शिक्षेची सुनावणी करेल.काय होता जळगाव घरकुल घोटाळातत्कालीन नगरपालिकेतील सत्ताधारी गटाने झोपडपट्टी निर्मुलनासाठी स्वस्तात चांगली घरे बांधून देण्याची योजना आखली होती. त्यासाठी हुडको कड़ून कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेण्यात आले. दरम्यान, या योजनेच्या कामात अनियमितता असल्याचे 2001 मध्ये उघडकीस आले होते. तसेच पालिकेने ज्या जागेवर घरे बांधली ती जागा पालिकेच्या मालकीची नसल्याचे समोर आले. जळगावमधील हरी विठ्ठलनगर, खंडेरावनगर, समतानगर आणि तांबापुरा येथे सुमारे 110 कोटींचे कर्ज काढून 11 हजार घरे बांधण्याच्या कामास सन 1999 मध्ये सुरुवात झाली. याचे काम सत्ताधाऱ्यांनी खान्देश बिल्डर्स या मर्जीतील बिल्डरला दिले होते. तसेच त्याला 29 कोटी रुपये बिनव्याजी देण्यात आले.मात्र ठेकेदाराने हे काम विहीत वेळेत पूर्ण केले नाही. त्यानंतर काम पूर्ण करण्याची मुदत वारंवार वाढवली गेली. यादरम्यान, नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर झाले.  ठेकेदाराला बिनव्याजी रक्कम वापरण्याची परवानगी मिळाल्याने पालिका कर्जबाजारी झाली.  दरम्यान डॉ. प्रवीण गेडाम  हे पालिका आयुक्त असताना ही  बाब लक्षात आली. त्यानंतर शहर पोलीस ठाण्यात घरकुल योजनेत 29 कोटी 59 लाख 9 हजार रुपयांचा घोटाळा झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणी न्यायालयीन लढाई सुरू होती. 

टॅग्स :JalgaonजळगावCourtन्यायालयDhuleधुळे