सुरत पँसेंजरच्या इंजिनमध्ये बिघाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2017 00:36 IST2017-05-04T00:36:24+5:302017-05-04T00:36:24+5:30
दीड तास विलंब : प्रवाशांचा खोळंबा, तातडीने इंजिन बदलले

सुरत पँसेंजरच्या इंजिनमध्ये बिघाड
भुसावळ : भुसावळहून सायंकाळी ६.२५ वाजता सुरतला जाणारी ५९०१४ भुसावळ-सुरत पॅसेंजरच्या इंजिनमध्ये अचानक बिघाड झाला.त्यामुळे या गाडीचा सुमारे दीड तासापेक्षा जास्तवेळ खोळंबा झाला शिवाय प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली.
दरम्यान, बिघाड झालेले (क्रमांक- डब्ल्यूएजी-२३५६८) तातडीने बाजुला करुन दुसरे रेल्वे इंजिन लावून ही पॅसेंजर गाडी रात्री आठ वाजेनंतर पुढे सुरतकडे रवाना करण्यात आल्याची माहिती रेल्वे स्थानक व्यवस्थापक आर. के.कुठार यांनी सांगितले. इंजिनमध्ये नेमका काय बिघाड झाला याची तपासणी पीओएच शेडमध्ये केली जाईल,असे कुठार म्हणाले. दरम्यान सुरत पँसेंजर गाडीने जळगाव पर्यंत जाणाºया प्रवाशांना दुसºया गाडीने प्रवास करावा लागला.(प्रतिनिधी)
भुसावळ-सुरत पँसेंजरच्या इंजिनमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला. दुसरे इंजिन जोडून गाडी सोडण्यात आली. बिघाड झालेल्या इंजिनची येथील पीओएच शेडमध्ये तपासणी होईल.
- आर.के.कुठार, रेल्वे स्थानक व्यवस्थापक, भुसावळ.