लघु पाटबंधारे प्रकल्पात बुडून सुरतच्या बालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:22 IST2021-09-08T04:22:39+5:302021-09-08T04:22:39+5:30

करण अनिल श्रीनाथ हा दहावीच्या शिक्षणानंतर मावसा विनोद मुरलीधर भोईर यांच्याकडे गेल्या दोन वर्षांपासून वास्तव्यास होता. पारंपरिक मासे ...

Surat child drowns in small scale irrigation project | लघु पाटबंधारे प्रकल्पात बुडून सुरतच्या बालकाचा मृत्यू

लघु पाटबंधारे प्रकल्पात बुडून सुरतच्या बालकाचा मृत्यू

करण अनिल श्रीनाथ हा दहावीच्या शिक्षणानंतर मावसा विनोद मुरलीधर भोईर यांच्याकडे गेल्या दोन वर्षांपासून वास्तव्यास होता. पारंपरिक मासे पकडण्याच्या व्यवसायात तरबेज होता यावे या उद्देशातून तो नेहमीप्रमाणे गावाजवळील सूर्यभान शिंदे यांच्या शेताचे बांधा लगत असलेल्या वाड्या माळ्या धरणातील जवळ गेला होता. पाटबंधारे प्रकल्पाच्या वाटेने चालताना पाय घसरून तो प्रकल्पाच्या खोल पाण्यात पडला व बुडाला. हा प्रकार लक्षात येताच त्याच्या सोबत असलेले त्याचे मावसा विनोद भोई व सहकाऱ्यांनी २० मिनिटांच्या आत त्याला पाण्यातून बाहेर काढले. मात्र, त्याची प्राणज्योत मालवली होती.

करणच्या पश्चात मोठा भाऊ, आई, वडील असा परिवार आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर करणचे आई-वडील उधना येथून भुसावळकडे रवाना झाले होते. रात्री उशिरा करणवर अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत विनोद मुरलीधर भोई यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. तपास तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकाॅ युनूस शेख करीत आहेत.

Web Title: Surat child drowns in small scale irrigation project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.