सूरज झंवरला १६ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:56 IST2021-02-05T05:56:02+5:302021-02-05T05:56:02+5:30

मंगळवारी न्यायालयात हजर करताना पोलिसांनी दोन दिवसाची पोलीस कोठडीची विनंती केली होती,मात्र न्यायालयाने त्यास नकार दिला. सूरज याने पिता ...

Suraj Zanwar remanded in judicial custody till February 16 | सूरज झंवरला १६ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी

सूरज झंवरला १६ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी

मंगळवारी न्यायालयात हजर करताना पोलिसांनी दोन दिवसाची पोलीस कोठडीची विनंती केली होती,मात्र न्यायालयाने त्यास नकार दिला.

सूरज याने पिता सुनील झंवर व इतरांनी संगनमताने साई मार्केटींग ॲण्ड ट्रेडींग कंपनी या नावाने टेंडर भरल्याचे भासवून पुण्यातील निगडी, घोले रोड व नशिराबाद येथील मालमत्ता खरेदीत १६ कोटी रुपयांचा अपहार केला असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात मुदत ठेवीच्या पावत्या विकत घेऊन त्या बेकायदेशीर वर्ग करण्यात आल्या असल्याचे तपासात उघड झाले आहे.

पुणे पोलिसांनी झंवर कुटुंबियांची बँकेची माहिती घेण्याकरीता व खाते गोठविण्याकरीता बँकाना पत्रे दिलेली आहेत. त्यामुळे सूरज झंवर याने जळगाव येथील एचडीएफसी बँकेचे मॅनेजर व युनियन बँक ऑफ इंडियाचे नाशिक येथील रिजनल मॅनेजर यांना फोनद्वारे धमकी दिल्याचेही पोलिसांच्या तपासात उघड झाले होते. दरम्यान, या गुन्ह्यात प्रकाश जगन्नाथ वाणी (ठाणे) व अनिल रमेशचंद्र पगारिया (रा.शिवराम नगर) या दोघांना ३ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केलेला आहे. सरकारपक्षातर्फे ॲड.प्रवीण चव्हाण यांनी बाजू मांडली.

Web Title: Suraj Zanwar remanded in judicial custody till February 16

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.