शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
2
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
3
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
4
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
5
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
6
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
7
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
8
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
9
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
10
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
11
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
12
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
13
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
14
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
15
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
16
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
17
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
18
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
19
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स
20
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या

जळगावातील नाट्यगृहाच्या कामावर खासदार सुप्रिया सुळे यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 12:32 IST

नाट्यगृहाची दैना पाहून अजित पवारांनी उद्घाटनच केले नसते

ठळक मुद्देव्यक्त केली नाराजी #MeToo प्रकरणात सखोल चौकशी व्हावी

जळगाव : शहरात नव्याने उभारलेल्या बंदिस्त नाट्यगृहाची दैना पाहून अजित पवार यांनी या नाट्यगृहाचे उद्घाटनही केले नसते अशा शब्दात, खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी व्यक्त केली.राष्टÑवादी कॉँग्रेसतर्फे जळगाव ग्रामीण मतदार संघातील महिलांच्या मेळाव्याचे आयोजन शुक्रवारी छत्रपती संभाजीराजे बंदिस्त नाट्यगृहात करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या.व्यासपीठावर पक्षाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, महानगर जिल्हाध्यक्ष नामदेव चौधरी, महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, माजी जिल्हाध्यक्षा विजया पाटील, प्रदेश उपाध्यक्षा मंगला पाटील, महिला महानगर अध्यक्षा निला चौधरी,जिल्हा कार्याध्यक्ष विलास पाटील, महिला कार्याध्यक्षा मिनल पाटील, युवती अध्यक्षा कल्पिता पाटील, वाल्मीक पाटील यांच्यासह महिला तालुका अध्यक्षांची उपस्थिती होती.नाट्यगृहातील व्यासपीठाकडे कटाक्ष टाकत त्यांनी नाट्यगृहाच्या कामाबाबत व अस्वच्छतेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.‘गहिऱ्या’ किंमती वाढल्यासुप्रिया सुळे यांनी आपल्या भाषणात थेट महिलांशी संवाद साधला. गॅसच्या किंमती काय, पूर्वी किती होत्या. पेट्रोलच्या किंमती काय? परवडतात काय? यावर एका महिलेने किंमती ‘गहिºया’ वाढल्या असे उत्तर दिले. ‘गहिºया’ या शब्दाचा अर्थ समजून घेत भाषणात त्यांनी वारंवार या शब्दाचा उल्लेख केला.अन् भारनियमन बंद केलेयेथे मुख्यमंत्री येऊन गेले त्यांनी भारनियमनाची भेट दिली. पण आम्ही आंदोलन करताच जिल्ह्यातील भारनियमन बंद करण्यात आले असेही त्या म्हणाल्या.नाट्यकर्मींनी दिले देवकरांना मानपत्रज्येष्ठ नाट्यकर्मी शंभू पाटील व अन्य नाट्यकर्मींनी नाट्यगृहाच्या उभारणीत मोलाचे योगदान दिल्याबद्दल माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचा गौरव केला. मानपत्राचे वाचन नाट्यकर्मी हर्षल पाटील यांनी केले. शहरातील नाटयकर्मी यावेळी उपस्थित होते.#MeToo प्रकरणात सखोल चौकशी व्हावीसुप्रिया सुळे म्हणाल्या, महिलांवरील अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी सुरू झालेली ‘मी-टू’ मोहीम चांगली. अत्याचाराच्या घटनांचा निषेध करते. अत्याचार ज्यांनी केले, ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांची सखोल चौकशी केली जावी. केंद्रीय मंत्री एम.जे. अकबर यांच्यावही यात आरोप झाले आहेत. त्याबाबत पंतप्रधान दखल घेतील. डोक्यावर आजही हंडा कायम सत्तेत आल्यावर महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरवून त्यांना घरापर्यंत नळ कनेक्शन देण्याचे काम करू असे आश्वासन सुप्रिया सुळे यांनी महिला मेळाव्यात दिले. मात्र यापूर्वी अनेक वर्षे आपले सरकार असताना या समस्या दूर का झाल्या नाहीत असे विचारले असता त्या म्हणाल्या, आपल्या मताशी मी सहमत आहे. यात सर्वसमावेशक प्रयत्नांची गरज आहे. कॉँग्रेसच्या अ‍ॅड. ललिता पाटील यांच्या उमेदवारीबाबत माहिती नसून कोणी भेटले म्हणून उमेदवारी मिळते असे नाही असेही त्या म्हणाल्या.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव