चाळीसगावातील जनता कर्फ्यूला सहकार्य करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2021 03:28 PM2021-03-12T15:28:04+5:302021-03-12T15:29:35+5:30

शुक्रवारी येथील तहसिल कार्यालयात जनता कर्फ्यूबाबत प्रशासनाची बैठक पार पडली.

Support the people of Chalisgaon | चाळीसगावातील जनता कर्फ्यूला सहकार्य करा

चाळीसगावातील जनता कर्फ्यूला सहकार्य करा

Next
ठळक मुद्देप्रशासनाची बैठक : आमदार मंगेश चव्हाण यांचे आवाहन, सामाजिक संघटनांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्क

चाळीसगाव : संकट कितीही मोठे असले तरी, त्याला परतवून लावण्याची उर्जा आणि शक्ती जनतेच्या एकजुटीत असते. शनिवारी व रविवारी पुकारलेल्या जनता कर्फ्यूतही हीच एकजुट चाळीसगावकरांनी दाखवून प्रशासनाला सहकार्य करावे. कोरोनाचा प्रार्दूभाव यामुळे कमी होईल. असे आवाहन आमदार मंगेश चव्हाण यांनी येथे केले.

शुक्रवारी येथील तहसिल कार्यालयात सकाळी ११.३० वाजता झालेल्या प्रशासनाच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार उन्मेष पाटील, प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, डीवायएसपी कैलास गावडे, तहसिलदार अमोल मोरे, पोनि विजयकुमार ठाकुरवाड, नायब तहसिलदार विशाल सोनवणे उपस्थित होते.

कोरोनाच्या दुस-या लाटेत जिल्ह्यात चाळीसगाव तालुका या आजाराच्या संक्रमात आघाडीवर आहे. जिल्हाधिका-यांनी गुरुवारी जनता कर्फ्यूबाबत दिलेले निर्देश लक्षात घेऊनच शुक्रवारी ही बैठक घेण्यात आली. बैठकीत शनिवारी व रविवारी जनता संचारबंदीत कडकडीत बंद पाळण्याबाबत सुचना देण्यात आल्या. सर्व राजकीय पक्ष्यांसह सामाजिक संघटनांनी देखील यात सहभागी होऊन सहकार्य करावे. जनता संचारबंदी यस्वी झाल्यास लॉकडाऊनची समस्या उदभवणार नाही. असेही आमदार खासदार यांनी सागितले.

बैठकीला मुख्याधिकारी विकास नवाळे, उद्योजक वर्धमान धाडीवाल, दिलीप घोरपडे, मुराद पटेल, किराणा असोसिएशनचे जितेंद्र देशमुख, कापड असोसिएशनचे निलेश कटारीया, भाजीपाला असोसिएशनचे बापूसाहेब चौधरी, चाळीसगाव तालुका वृत्तपत्रकार मित्र मंडळाचे अध्यक्ष आर. डी. चौधरी, मेडीकल असोसिएशनचे विनोद जैन, विजय गायकवाड, पोलिस गोपीनिय विभागाचे गणेश पाटील व व्यापारी, पत्रकार उपस्थित होते.

Web Title: Support the people of Chalisgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.