आॅनलाईन लोकमतपारोळा, दि.१६ - तालुक्यातील ८ शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून जीवनयात्रा संपवली होती. या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी एक लाखाची आर्थिक मदत शासनाकडून प्राप्त झाली आहे. या धनादेशाचे वितरण आमदार डॉ.सतीश पाटील यांच्या हस्ते वारसांना करण्यात आलेयात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे वारस पुढीलप्रमाणे कल्पना ईश्वर पाटील (रा. मंगरुळ), ज्योती प्रेमराज पाटील (रा.लोणी बु), सरलाबाई सुभाष पाटील (रा. हिरापूर), प्रतिभा जिभाऊ पाटील (रा.करमाड), लताबाई तुकाराम पाटील (रा. करमाड बु), संतोष अभिमन पाटील (रा. राजवड) , जिजाबाई शालिक जाधव (रा.दळवेल) , सखुबाई प्रकाश भिल (रा.भोंडन दिगर) यांचा समावेश आहे.या वेळी तहसीलदार श्वेता संचेती, नायब तहसीलदार दीक्षित, अव्वल कारकून वारकर, तालुका अध्यक्ष बाळू पाटील, युवक अध्यक्ष किशोर पाटील, डी. के. पाटील उपस्थित होते.
पारोळा येथे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 17:18 IST
आमदार डॉ.सतीश पाटील यांच्या हस्ते प्रत्येकी एक लाखांच्या धनादेशाचे वितरण
पारोळा येथे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना मदत
ठळक मुद्देपारोळा तालुक्यातील आठ शेतकऱ्यांनी केली होती आत्महत्याआमदार डॉ.सतीश पाटील यांच्या हस्ते प्रत्येक एक लाखांच्या धनादेशाचे वितरणतहसीलदारांसह शेतकऱ्यांच्या वारसांची उपस्थिती