गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत आघाडी सरकारच्या समर्थनार्थ घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 19:58 IST2020-05-22T19:57:17+5:302020-05-22T19:58:35+5:30
जळगाव : भाजपकडुन ‘माझे अंगण, माझे रणांगण ’अंतर्गत शुक्रवारी राज्य सरकारच्या निषेधाचा कार्यक्रम घेण्यात आला. जेष्ठ नेते माजीमंत्री आमदार ...

गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत आघाडी सरकारच्या समर्थनार्थ घोषणा
जळगाव : भाजपकडुन ‘माझे अंगण, माझे रणांगण ’अंतर्गत शुक्रवारी राज्य सरकारच्या निषेधाचा कार्यक्रम घेण्यात आला. जेष्ठ नेते माजीमंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या जामनेर येथील निवास स्थानासमोर झालेल्या या आंदोलनाप्रसंगी प्रसंगी महाजन यांनी ठाकरे सरकारचा असे म्हणताच कार्यकर्त्यांमधुन विजय असो ...अशी घोषणा दिली असा व्हीडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत असल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. महाजन यांनी एकदा नव्हे तर दोनदा ठाकरे सरकारचा असे म्हणताच कार्यकर्त्याकडुन विजय असो अशी घोषणा देत असल्याचे व्हीडीओत दिसत आहे. यानंतर महाजन यांनी महाविकास आघाडीचा असे म्हणताच निषेध असो अशी घोषणा कार्यकर्ते देत असल्याचे दिसते.
कोरोना स्थिती हाताळण्यात राज्य शासन पुर्णत: अपयशी ठरल्याने त्यांचा निषेध केला. कार्यकर्त्यांनी निषेधाच्याच घोषणा दिल्या, विजयाची घोषणा दिली नाही. कुणीतरी व्हीडीओत तोडमोड करुन प्रसारीत केल्याचे दिसते. - गिरीश महाजन, माजीमंत्री, आमदार