डॉक्टरांच्या बंद दरम्यान जखमीला जिल्हा रुग्णालयाचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 13:21 IST2018-01-03T13:21:10+5:302018-01-03T13:21:41+5:30
कटरने कापला गेला हात

डॉक्टरांच्या बंद दरम्यान जखमीला जिल्हा रुग्णालयाचा आधार
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 03- खाजगी डॉक्टरांनी पुकारलेल्या बंद दरम्यान हाताला इजा झाल्याने चार ते पाच रुग्णालय फिरुन उपचार न मिळाल्याने अखेर जखमीवर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. यामुळे बाबुलाल सैनी या बांधकाम कामगाराला जिल्हा रुग्णालय आधार ठरले.
बाबुलाल सैनी (22, रा. पिंप्राळा) हा तरुण बांधकामाचे काम करतो. मंगळवारी दुपारी बारा वाजेदरम्यान तो टाईल्स कापायच्या कटरने लाकूड कापत होता. त्यावेळी अचानक हे कटर त्याच्या डाव्या हातावर लागले. धारदार कटर वेगात असल्याने तरुणाच्या हाताला जबर इजा झाली. या वेळी त्याला तत्काळ त्याच्या सहका:यांनी खाजगी रुग्णालयात हलविले. मात्र रुग्णालय बंद असल्याने तेथून ते आणखी तीन ते चार खाजगी रुग्णालयात पोहचले. मात्र बंदमुळे डॉक्टर नसल्याने तरुणास अखेर जिल्हा रुग्णालयात हलविले. त्या ठिकाणी त्याच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर संध्याकाळी त्याला जिल्हा रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
बंद दरम्यानअनेक ठिकाणी फिरुन उपचार न मिळाल्याने जिल्हा रुग्णालयात उपचार मिळाल्याने हे रुग्णालय आधार ठरल्याची भावना या तरुणासह त्याच्या सहका-यांनी व्यक्त केली.