सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाचे पुरस्कार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:20 IST2021-08-21T04:20:01+5:302021-08-21T04:20:01+5:30
जळगाव : जळगाव तथा नाशिक येथील साहित्य क्षेत्रातील अग्रेसर असलेल्या सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्यावतीने ज्येष्ठ समाजसेवक गिरीश गांधी (नागपूर ...

सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाचे पुरस्कार जाहीर
जळगाव : जळगाव तथा नाशिक येथील साहित्य क्षेत्रातील अग्रेसर असलेल्या सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्यावतीने ज्येष्ठ समाजसेवक गिरीश गांधी (नागपूर ) यांना पहिला सेवादास, तर जळगावातील दलुभाऊ जैन यांना सूर्योदय समाजसेवा हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष सतीश जैन यांनी शुक्रवारी दिली.
महाकवी सुधाकर गायधनी, सावळीराम तिदमे, साहेबराव पाटील, डी. बी. महाजन, प्रवीण लोहार यांच्या निवड समितीने गिरीश गांधी यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे. २१ हजार रुपये व गौरवपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. गिरीश गांधी यांचे पर्यावरण, साहित्य, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान आहे. त्यांना हा पुरस्कार जानेवारी २०२२ मध्ये जळगावात होणाऱ्या पहिल्या अखिल भारतीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलनात प्रदान करण्यात येणार आहे.
गिरीश गांधी यांना आतापर्यंत भारत सरकारचा इंदिरा गांधी पर्यावरण, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार, वसंतराव नाईक कृषी प्रतिष्ठानचा पुरस्कार, झाकीर हुसेन मेमोरियल राष्ट्रीय पुरस्कार, संत तुकडोजी महाराज जीवन साधना पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलेले आहे.