शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

सुनील झवर माझ्यासह सर्वांचेच निकटवर्तीय; चौकशीत सर्व निष्पन्न होईल- गिरीश महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 19:46 IST

पोलीस यंत्रणा चौकशी करीत आहे, त्यात सर्व काही निष्पन्न होईल, असा दावा माजी मंंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी जळगावात केला.

जळगाव : बीएचआर पतसंस्था गैरव्यवहार प्रकरणात अटक करण्यात आलेले सुनील झवर  हे माझ्यासह सर्वांचेच निकटवर्तीय आहे. पोलीस यंत्रणा चौकशी करीत आहे, त्यात सर्व काही निष्पन्न होईल, असा दावा माजी मंंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी जळगावात केला.

दरम्यान, पाऊस नसल्याने शेतकरी संकटात सापडला असून जिल्ह्यात सरसकट दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणीदेखील त्यांनी केली.  गेल्या अनेक दिवसांपासून खान्देशात पाऊस नसल्याने उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी भाजपच्यावतीने शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले, त्या वेळी  पत्रकारांशी बोलताना झवर यांच्याविषयी त्यांनी वरील वक्तव्य केले. 

कोणी सांगावे, निकटवर्तीय नाही?

बीएचआर पतसंस्था गैरव्यवहार प्रकरणात मास्टरमाईंड सुनील झवर याला अटक झाल्यानंतर त्याचे कोणा-कोणाशी संबंध आहे, कोण निकटवर्तीय आहे, या विषयी चर्चा सुरू झाली आहे. सोबतच झवर याच्याकडे काही मंडळींचे कागदपत्रेही सापडले. या अटकेनंतर झवर हे आपले निकटवर्तीय असण्याविषयी  गिरीश महाजन यांना विचारले असता ते म्हणाले की, पोलीस यंत्रणा चौकशी करीत आहे. कायद्यानुसार जे होईल ते होणारच आहे. झवर हे तर सर्वांचेच निकटवर्तीय असून तसे नसल्यास कोणी सांगावे, असे आव्हानही त्यांनी दिले. या संदर्भात त्यांनी अधिक बोलणे टाळले. 

सरसकट मदत करा

पाऊस नसल्याने जिल्ह्यात दुबार, तिबार पेरण्या करूनही त्या वाया जात आहे. सर्वच पिके नष्ट झाले असून नदी, नाले, धरणात पाणीसाठा वाढलेला नाही. त्यामुळे राज्य सरकारने पंचनामे न करता सरसकट मदत द्यावी,  जो पर्यंत ढग आहे, तोपर्यंत कृत्रिम पावसासाठीही प्रयत्न करावा, अशी मागणी गिरीश महाजन यांनी केली. या विषयी त्यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदनदेखील दिले. या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, आमदार संजय सावकारे, माजी आमदार स्मिता वाघ, जि.प. अध्यक्षा रंजना पाटील, उपाध्यक्ष  लालचंद पाटील, भाजप जिल्हा महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी आदी उपस्थित होते. 

मंत्र्यांचे केवळ दौरे, जिल्हावासीयांची निराशा

महाविकास आघाडीतील मंत्री निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जिल्ह्याचे दौरे करीत आहे. त्यांनी यावे, मात्र जिल्ह्यासाठी काहीतरी द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. हे मंत्री येऊन निघून जातात, मात्र शेतकरी, सामान्य जनता यांचा विचार करीत नसल्याचा आरोप महाजन यांनी केला. गावागावत विजेचा प्रश्न गंभीर असून शेतकऱ्यांनाही पुरेसी वीज मिळत नाही, रोहित्र जळाले तर ते मिळत नाही व ऑईलचे कारण सांगितले जाते. इतकी बिकट राज्यात कधी नव्हती. अशा परिस्थितीकडे हे सरकार दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप महाजन यांनी केला.

टॅग्स :Girish Mahajanगिरीश महाजनJalgaonजळगाव