उच्च न्यायालयाने फटकारताच सुनील झंवरने अटकपूर्व घेतला मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:16 IST2021-03-18T04:16:26+5:302021-03-18T04:16:26+5:30

बीएचआरच्या फसवणूक व अपहार प्रकरणात उद्योजक सुनील झंवर याला मुंबई उच्च न्यायालयाने दोन आठवडे अटकेपासून संरक्षण दिले होते. ...

Sunil Zanwar withdrew his arrest after the High Court struck him down | उच्च न्यायालयाने फटकारताच सुनील झंवरने अटकपूर्व घेतला मागे

उच्च न्यायालयाने फटकारताच सुनील झंवरने अटकपूर्व घेतला मागे

बीएचआरच्या फसवणूक व अपहार प्रकरणात उद्योजक सुनील झंवर याला मुंबई उच्च न्यायालयाने दोन आठवडे अटकेपासून संरक्षण दिले होते. मूळ फिर्याद रद्द करण्यासाठी झंवर याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, त्यावर कामकाज करताना न्यायालयाने एक आठवड्यात झंवर याने पुण्याच्या विशेष सत्र न्यायालयात जाऊन अटकपूर्व जामिनासाठी जावे व त्यापुढील आठवड्यात न्यायालयाने निकाल द्यावा, असे आदेश दिले होते. मात्र झंवर याने विशेष न्यायालयात न जाता पुन्हा उच्च न्यायालयातच अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केल्याने न्यायमूर्तींनी तीव्र नाराजी व्यक्त करतानाच झंवर याला फटकारत अर्ज मागे घेण्याचे सांगून विशेष न्यायालयातच जाण्याचे सांगितले. विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी हा संपूर्ण घटनाक्रम न्यायालयाच्या निदर्शनास आणून देत झंवर याला दिलासा देण्याबाबत प्रखर विरोध केला. दरम्यान, याच प्रकरणात पोलिसांना हवा असलेला तत्कालीन अवसायक जितेंद्र कंडारे याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर गुरुवारी पुण्याच्या विशेष न्यायालयात युक्तिवाद होणार आहे.

Web Title: Sunil Zanwar withdrew his arrest after the High Court struck him down