सुनेने सासूला पेटविले; मृत्युमुळे खुनाचा गुन्हा

By Admin | Updated: May 18, 2014 01:20 IST2014-05-18T01:20:46+5:302014-05-18T01:20:46+5:30

शिरपूर : तालुक्यातील भोरखेडा येथील ५० वर्षीय सुनेने ६५ वर्षीय वृद्ध सासूच्या त्रासाला कंटाळून पेटवून दिल्याची घटना घडली होती़ उपचार घेत असताना शनिवारी तिचा मृत्यू झाला़

Sunele smiled to mother-in-law; Death crime | सुनेने सासूला पेटविले; मृत्युमुळे खुनाचा गुन्हा

सुनेने सासूला पेटविले; मृत्युमुळे खुनाचा गुन्हा

शिरपूर : तालुक्यातील भोरखेडा येथील ५० वर्षीय सुनेने ६५ वर्षीय वृद्ध सासूच्या त्रासाला कंटाळून पेटवून दिल्याची घटना घडली होती़ उपचार घेत असताना शनिवारी तिचा मृत्यू झाला़ भोरखेडा येथील रहिवासी कमलाबाई शेनपडू गिरासे (६५) व तिची सून सुमनबाई दरबार गिरासे (५०) हे दोघे एकत्र राहत होते़ त्यांचे किरकोळ कारणावरून वाद होत होते़ १४ रोजी दुपारच्या सुमारास कमलाबाई खाटेवरून लघुशंकेला उठली असताना अचानक सून सुमनबाई हिने पाठीमागून येऊन अंगावर रॉकेल टाकून जाळून टाकले़ त्यात ती वृद्ध महिला ६३ टक्के भाजली़ दरम्यान, वृद्ध महिलेने दिलेल्या जबाबावरून थाळनेर पोलिसात भादंवि कलम ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ जिल्हा रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असताना शनिवारी तिचा मृत्यू झाला़ त्यामुळे सुनेला अटक करून खुनाचा गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू होती़ शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले़ मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही़

Web Title: Sunele smiled to mother-in-law; Death crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.