सासूच्या खूनप्रकरणी सुनेला दोन दिवस पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:14 IST2021-06-04T04:14:23+5:302021-06-04T04:14:23+5:30
भुसावळ : सासू-सुनेचा झालेल्या वादाचे रूपांतर विकोपाला जाऊन सुनेने आपल्या सासूच्या मानेवर विळ्याने वार करून खून केल्याप्रकरणी सून ...

सासूच्या खूनप्रकरणी सुनेला दोन दिवस पोलीस कोठडी
भुसावळ : सासू-सुनेचा झालेल्या वादाचे रूपांतर विकोपाला जाऊन सुनेने आपल्या सासूच्या मानेवर विळ्याने वार करून खून केल्याप्रकरणी सून उज्ज्वला रवींद्र सोनवणे (३८) हिला दोन दिवस पोलीस कोठडी देण्यात आली.
ही घटना गजानन महाराज नगर भागातील कुठे माध्यमिक विद्यालय प्रवेशद्वाराजवळ बुधवारी सायंकाळी घडली होती.
या घटनेत सासू द्वारकाबाई पंढरीनाथ सोनवणे (७५) यांचा मृत्यू झाला तर सून उज्ज्वला रवींद्र सोनवणे हिला पोलिसांनी अटक केली होती, गुरुवारी सुनेला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
प.क.कोटेचा शाळेत वाॅचमन म्हणून रवींद्र सोनवणे कार्यरत आहे. त्यांच्या पत्नी व आई यांच्यात कौटुंबिक वाद विकोपाला गेल्याने नेहमीच खटके उडत होते. रवींद्र सोनवणे हे किराणा घेण्यासाठी बाहेर पडतात. सासू-सुनेमध्ये वाद झाल्याने सून उज्ज्वलाने सासू द्वारकाबाई यांच्या डोक्यावर, मानेवर, पाठीवर विळ्याचे वार करून हत्या केली होती.