जळगाव जिल्ह्यासाठी रविवार ठरला घातवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:18 IST2021-09-21T04:18:42+5:302021-09-21T04:18:42+5:30

जळगाव : रविवार हा जळगाव जिल्ह्यासाठी घातवार ठरला. एकाच दिवशी दोन बालकांसह चार जणांचा तलावात बुडून मृत्यू झाला ...

Sunday was a nightmare for Jalgaon district | जळगाव जिल्ह्यासाठी रविवार ठरला घातवार

जळगाव जिल्ह्यासाठी रविवार ठरला घातवार

जळगाव : रविवार हा जळगाव जिल्ह्यासाठी घातवार ठरला. एकाच दिवशी दोन बालकांसह चार जणांचा तलावात बुडून मृत्यू झाला तर दोन तरुण अपघातात ठार झाले. या घटना जांभूळ, ता. जामनेर व वाघळी, ता. चाळीसगाव येथे घडल्या.

चुलत बहीण-भावाचा तलावात बुडून

तलावाजवळ खेळत असतांना पाण्यात बुडून चुलत बहीण- भावंडाचा करुण अंत झाला. ही घटना जांभूळ, ता. जामनेर शिवारात रविवारी दुपारी १.३० वाजता घडली. पायल नितीन जोशी (७) व रूद्र गोरख जोशी( ५) आशी मृत बहीण-भावंडाची नावे आहेत.

गणपती विसर्जनाच्या दिवशी ही घटना घडल्याने जांभूळ गावावर शोककळा पसरली आहे.

दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू

वाघळी, ता. चाळीसगाव येथे पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी सायंकाळी घडली.

साहिल शरीफ शहा (१०) व आयान शरीफ शहा (१४, दोघेही रा. वाघळी) अशी या मृत मुलांची नावे आहेत.

डंपरच्या धडकेत दोन तरुण ठार

भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार दोन तरुण जागीच ठार झाले. ही घटना रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास चाळीसगाव तालुक्यातील वाघळी गावाच्या भैरवनाथ मंदिराजवळ घडली. मोहम्मद शाकीर अली जाकीर अली ( २८) आणि शमीम शाह (२६, रा.मध्य प्रदेश ) अशी मृतांची नावे आहेत. हे दोघे बांधकाम मजूर होते.

Web Title: Sunday was a nightmare for Jalgaon district