शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
3
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
4
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
5
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
6
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
7
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
8
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
9
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
10
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
11
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
12
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
13
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
14
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
15
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
16
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
17
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
18
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
19
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
20
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"

संडे स्पेशल मुलाखत- कीर्तन सेवा हे समाज सेवेचे प्रभावी माध्यम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2020 11:02 PM

ज्याप्रमाणे दिवा हा पणतीशिवाय अर्थहीन आहे. त्याचप्रमाणे कन्येशिवाय ही सृष्टीदेखील अपूर्ण आहे, असे मला वाटते. - दुर्गाताई संतोष मराठे

ठळक मुद्देचर्चेतील व्यक्तिशी थेट संवादकीर्तन सेवा हे समाजसेवेचे प्रभावी माध्यम

विनायक वाडेकरमुक्ताईनगर : कीर्तन सेवा हे समाजसेवेचे प्रभावी माध्यम असल्याचे अखिल भारतीय वारकरी मंडळ महिला आघाडीच्या जळगाव जिल्हाध्यक्षा दुर्गाताई संतोष मराठे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.कीर्तन सेवेला समाजसेवेचे प्रभावी माध्यम म्हणून अध्यात्म, संत परंपरा, आदिशक्ती मुक्ताईचे महात्म्य, स्त्री मुक्ती, भ्रूणहत्या, स्त्री शिक्षण, हुंडाबळी, बालसंस्कार आणि कुपोषण यासारख्या विविध सामाजिक विषयांवर प्रभावीपणे समाज प्रबोधन करून महिलांमध्ये जनजागृती निर्माण करणाऱ्या कीर्तनकार म्हणून दुर्गाताई मराठे यांच्याकडे पाहिले जाते.प्रश्न- कीर्तनावर पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा असताना या क्षेत्रात आपण वळल्या कशा?उत्तर- बालपणापासूनच घरात आई हरिपाठ म्हणायची. संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर यांचे अभंग आई म्हणायची व भागवत कथा ऐकायलासुद्धा जायची. त्यावेळी गुरुवर्य तुळशीरामबाबा वानखेडे यांच्या विचारांनी प्रभावित होत एकनाथी भागवत ऐकत असताना ही प्रेरणा मिळाली. एवढेच नव्हे तर त्या काळातील दोन महिला कीर्तनकार हभप गोदावरीताई बंड, आणि हभप घाटेताई यांच्या कीर्तन शैलीतून मला वेगळी अनुभूती मिळाली आणि‘विषयाचे बळ तुका म्हणे तेची फळं!’या उक्तीनुसार मला कीर्तन करण्याचे बळ मिळाले. असे म्हणतात पायाळू व्यक्तीला काजळी लावली तर धनाचा साठा मिळतो, तसाच कीर्तन रुपी काजळी जीवनाला लाभल्यानंतर जीवन परिपूर्ण होते म्हणून कीर्तन या क्षेत्राकडे मी वळले.प्रश्न- कीर्तनाला सुरुवात कधी केली व तो अनुभव कसा होता?उत्तर- माझे माहेर सुटाळा, ता.खामगाव, जि.बुलढाणा असून इयत्ता दहावीला शिकत असताना १९९९मध्ये वाडी, ता.खामगाव येथे हनुमान मंदिरात तुळशीराम बाबा यांनी सहज मला ज्ञानेश्वरी पारायण संपल्यानंतर दुर्गा तू कीर्तन करू शकते हे सांगितले आणि गोपाळकाल्याच्या दिवशी जवळपास २०० श्रोत्यांसमोर मला उभे केले. सुरुवातीला भीती वाटली पण जसजसे कीर्तन पुढे गेले आणि मी भक्तीत तल्लीन झाले‘संतांचे पायी हा माझा विश्वाससर्व भावे दास झालो त्यांचे!!’हा पहिला अभंग घेत मी खºया अर्थाने कीर्तनाला सुरुवात केली.प्रश्न- महिला कीर्तनकार म्हणून माहेरी व सासरी कधी अडचणी निर्माण झाल्या व आतापर्यंत केलेले कीर्तन किती?उत्तर- माझ्या कीर्तनाचा आशयच सामाजिक असल्याने लग्नाआधी जवळपास दीड हजार कीर्तन केले आहेत. जीवनात आई-वडील हे प्रथम गुरू, शैक्षणिक गुरू हे द्वितीय आणि अध्यात्मिक गुरू हे तृतीय असतात. आई-वडील हे यांच्यामुळे आपली ओळख होते, तर शैक्षणिक गुरुमुळे अर्थाजन होते आणि भगवंतापर्यंत पोचवणारा गुरू म्हणजे अध्यात्मिक गुरू असतो. महिला कीर्तनकार म्हणून मला माहेरी कधी विरोध किंवा अडचण झाली नाही, किंबहुना लग्नानंतर तर माझे सासरे सुपडू भिकनराव मराठे व सासू चंद्रभागा सुपडू मराठे हे दोन्ही वारकरी संप्रदायाशी व अध्यात्माशी रूजलेले असल्याने आणि पती संतोष सुपडू मराठे हेदेखील अध्यात्म मार्गाने मार्गक्रमण करणारे असल्याने लग्नानंतरही दीड हजारावर कीर्तन केले आहेत. आदीशक्ती मुक्ताईने १४०० वर्षे तपश्चर्या केलेल्या संत चांगदेव महाराजांना देवबुद्धीचा मार्ग शिकविला म्हणून‘चांगदेव म्हणे आजी जन्मा आलो,गुरुपुत्र झालो मुक्ताईचा!यावरून गुरू-शिष्य परंपरेची महतीदेखील कीर्तनातून दुर्गाताई मराठे या वर्णन करत असतात.प्रश्न- कीर्तनाच्या माध्यमातून सामाजिक आशय दर्शवताना खरा संदेश काय द्याल?उत्तर- शिक्षण ही काळाची गरज असून स्त्री शिक्षणातून भ्रूणहत्या थांबवून २० वर्षांपासून जननदर मुलींचा कमी होत आलेला आहे, ती कुप्रथा बंद झाली पाहिजे. मुलींची संख्या कमी झाल्यानेच पापाची वृत्ती वाढली असून बलात्कारासारखे गंभीर गुन्हे घडत आहे. विद्यमान काळात कोरोनासारखा विषाणू येऊन महामारी का आली? असे आपण म्हणतो. परंतु तुकाराम महाराज म्हणतात,‘तुका म्हणे पापे,येती रोगाची रूपे!’हीच वस्तुस्थिती आहे. कोरोनासारख्या महामारीचा उल्लेख शिवपुराण यामध्ये आढळून येतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दर आठ पंधरा दिवसांनी येऊन स्वच्छता व सोशल डिस्टन्सिंग पाळण्यातसंदर्भात संदेश देत आहेत. हेच संदेश संत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेत सांगण्यात आले आहे. मात्र असत्य वाढले, धर्म लोप पावला, वर्तणूक बदलली, हिंसा वाढले या सर्वांसाठी कीर्तन हे समाज प्रबोधनाचे खरे माध्यम ठरत आहे म्हणून त्या म्हणतात-‘आता तरी पुढे हाचि उपदेश नका करू नाश आयुष्याचा!’सरकारने जनजागृतीसाठी कीर्तन क्षेत्राला व्यासपीठ उपलब्ध करून दिल्यास सामाजिक विषय जगापर्यंत पोहोचवणे सोपे झाले असते. मुक्ताईनगर तालुक्यासारख्या ठिकाणी पुरुष व महिला कीर्तनकारांना व्यासपीठ उपलब्ध करून त्यांचे कीर्तन यू-ट्यूबसारख्या माध्यमात प्रसारित केल्यास ते एक प्रभावी प्रबोधन ठरेल आणि संस्कारक्षम पिढी निर्माण होईल, असे मत दुर्गाताई मराठे यांनी व्यक्त केले.‘ऐका कलियुगाचे महिमानअसत्या सी रिझले जण,पाप देती अनुमोदन,भरती हेडण संतांचे!’असे सांगत उच्चप्रतीचे पाप म्हणजे भ्रूणहत्या व ही भ्रूणहत्या म्हणजेच ब्रह्महत्या समान आहे. ज्याप्रमाणे दिवा पणती शिवाय अर्थहीन आहे त्याचप्रमाणे कन्येशिवाय ही सृष्टी अपूर्ण आहे, असे मत दुर्गाताई मराठे व्यक्त करतात.

टॅग्स :interviewमुलाखतMuktainagarमुक्ताईनगर