डांभुर्णीच्या युवकाची कळवणला गळफास घेवून आत्महत्या

By Admin | Updated: June 25, 2017 12:30 IST2017-06-25T12:30:19+5:302017-06-25T12:30:19+5:30

मोबाईल बंद असल्याने आत्महत्येबाबत निर्माण झाला संशय

Suicides by taking abusive language from the thistle of purple | डांभुर्णीच्या युवकाची कळवणला गळफास घेवून आत्महत्या

डांभुर्णीच्या युवकाची कळवणला गळफास घेवून आत्महत्या

 ऑनलाईन लोकमत

यावल/डांभुर्णी,दि.25 - सहा दिवसांपासून बेपता असलेला डांभुर्णी येथील सागर दिवाकर सोनवणे (वय 23) या युवकाने नाशिक जिल्हयातील कळवण येथील सप्तशंृगी  गडाच्या रस्त्यावरील झाडास गळफास लावून आत्महत्या केली. शनिवारी सकाळी  हा प्रकार उघडकीस आला.  कळवण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.  
सागर  19 जून  रोजी पुणे येथे नोकरीच्या ठिकाणी जातो असे सांगून निघाला होता. मात्र 4-5 दिवसात तो  पुणे पोहचलाच नसल्याने त्याच्या कुटुंबातील सदस्य चिंतेत होते. सागर खाजगी कंपनीत नोकरीस होता तो मित्राच्या लगAासाठी गावी आला होता. तो पुण्याला पोहचला नसल्याने 21 जून रोजी येथील पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली होती. सागर पुण्यास जातो असे सांगून कळवणला कसा पेाहचला  यासह  त्याने 19 तारखेपासून मोबाईल बंद का ठेवला होता याचे गुढ कायम आहे.  

Web Title: Suicides by taking abusive language from the thistle of purple