जळगाव : धावत्या रेल्वेखाली स्वत:ला झोकून देत शिवकॉलनीतील प्रेमसिंग रंगलाल चव्हाण (३९) या तरूणाने आत्महत्या केल्याची घटना असोदा रेल्वे गेटनजीक बुधवारी दुपारी अडीच वाजता घडली़प्रेमसिंग हे शिवकॉलनीत पत्नी व दोन मुलांसह वास्तव्यास होते़ रखवालदारीसह व एका हॉटेलात वेटरचे काम करून ते घरचा उदरनिर्वाह करायचे़ बुधवारी दुपारी त्यांनी असोदा रेल्वेगेटजवळील खांबा क्रमांक ४२१/८-१० अपलाईनवर धावत्या रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली़ याबाबत स्टेशन प्रबंधक आऱ के़ वालेचा यांनी शनिपेठ पोलीस ठाण्याला घटनेची माहिती दिली़ सहाय्यक फौजदार ज्ञानेश्वर पवार व पोलीस कर्मचारी धनंजय येवले यांनी घटनास्थळी धाव घेतली़ अंगझडती घेतली असता पँटच्या खिशात पॅनकार्ड, वाहन क्रमांक व मोबाईल क्रमांक असलेले काही कागद सापडले़ त्यावरून मृतदेहाची ओळख पटली. पोलिसांनी नातेवाईकांशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. सायंकाळी शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
रेल्वेखाली झोकून देत तरूणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 12:21 IST