आजाराला कंटाळून इसमाची वरणगावात आत्महत्या
By Admin | Updated: May 20, 2017 12:09 IST2017-05-20T12:09:57+5:302017-05-20T12:09:57+5:30
रवींद्र रूपचंद बोदडे (वय 55, सिद्धेश्वर नगर, वरणगाव) असे मयत इसमाचे नाव आह़े

आजाराला कंटाळून इसमाची वरणगावात आत्महत्या
ऑनलाइन लोकमत
वरणगाव, जि. जळगाव, दि. 20 - आजाराने त्रस्त झालेल्या इसमाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली़ शुक्रवारी रात्री ही घटना मन्यारखेडा रस्त्यावरील शेतात घडली़ रवींद्र रूपचंद बोदडे (वय 55, सिद्धेश्वर नगर, वरणगाव) असे मयत इसमाचे नाव आह़े अशोक राजाराम बोदडे यांनी वरणगाव पोलीस ठाण्यात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली़