विष प्राशन करून महिलेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 21:34 IST2019-09-03T21:33:47+5:302019-09-03T21:34:16+5:30
चोपडा : तालुक्याातील उमर्टी येथील महिलेने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना २ रोजी रात्री घडली. याबाबत ग्रामीण ...

विष प्राशन करून महिलेची आत्महत्या
चोपडा : तालुक्याातील उमर्टी येथील महिलेने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना २ रोजी रात्री घडली. याबाबत ग्रामीण पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
मंदा मुरलीधर धनगर (३८) असे मृत महिलेचे नाव आहे. २ सप्टेंबर रोजी रात्री ९ :३० वाजेच्या सुमारास त्यांनी राहत्या घरात काहीतरी विषारी द्रव्य प्राशन केले. नातेवाईकांनी त्यांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारादरम्यन त्यांचा मृत्यू झाला. याबाबत उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.शरद पाटील यांच्या खबरीवरून ग्रामीण पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक भीमराव नंदूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार लक्ष्मण शिंगाणे करीत आहेत.