Suicide of a widowed woman due to her husband's suicide | पतीच्या आत्महत्येमुळे विधवा झालेल्या महिलेचीही आत्महत्या

पतीच्या आत्महत्येमुळे विधवा झालेल्या महिलेचीही आत्महत्या

रावेर : शहरातील जुना सावदा रोडवरील पंचमुखी हनुमान मंदिराजवळील रहिवासी असलेली विधवा महिला भारती दिनेश चौधरी (वय ४२) यांनी त्यांचे वरच्या मजल्यावरील राहत्या घरात गळफास घेऊन सकाळी सात वाजेच्या सुमारास आत्महत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी रावेर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेबाबत रावेर पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील पंचमुखी हनुमान मंदिराजवळ रहिवासास असलेल्या विधवा महिला भारती दिनेश चौधरी (वय ४२) यांनी त्यांचे वरच्या मजल्यावरील राहत्या घरात छताला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन सकाळी सात वाजेच्या सुमारास आत्महत्या केल्याची घटना समोर आली. सदर महिलेचे सासरे लग्न सोईरीकच्या कामासाठी बाहेरगावी जाण्याचे तयारीत असताना ते बाहेरून घरी आल्यानंतर त्यांना सुनबाईने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समजली. सदर विधवा महिलेचे पती दिनेश चौधरी यांनीही १३ते १४ वर्षांपुर्वी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या कटू स्मृतींना आप्तेष्टांकडून यावेळी व्यक्त झाल्या. पतीच्या निधनानंतर हलाखीची परिस्थिती असताना एकूलता एक मुलगा कुणाल (वय १९) याचा सांभाळ करून त्यांनी आपली गुजराण सुरु ठेवली होती. तर सदर विधवा महिलेच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. मृत महिलेचे दीर अनील सखाराम चौधरी यांनी खबर दिल्यावरून रावेर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत महिलेच्या माहेरातील मंडळीने ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात एकच आक्रोश केला. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एन. डी. महाजन यांनी शवविच्छेदन केले. रावेर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक महेंद्र सुरवाडे हे पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Suicide of a widowed woman due to her husband's suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.