तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 17:01 IST2017-08-21T16:59:11+5:302017-08-21T17:01:06+5:30

माळपिंप्री येथे सोमवारी सकाळी आत्महत्येची घटना उघडकीस आली.

Suicide by the victim's throat | तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

ठळक मुद्देघरात छताला लोखंडी अँगलला ओढणीने गळफास घेऊन संपविले.आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्टबारावीनंतर सोडले शिक्षण

लोकमत ऑनलाईन पळासखेडे बुद्रूक, जि. जळगाव, दि. 21 : जामनेर तालुक्यातील माळपिंप्री येथील सीमा कैलास काळबैले (वय 19) या अविवाहीत तरुणीने आपल्या राहत्या घरात छताला लोखंडी अँगलला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना 21 रोजी सकाळी सहा वाजता उघडकीस आली. सीमाच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. तिने ऐन पोळयासारख्या सणासुदीच्या दिवशी आत्महत्या केल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. तिने बारावीनंतर शिक्षण सोडले होते. तिच्या पश्चात आई व भाऊ आहेत. याबाबत अरुण आत्माराम पाटील यांनी जामनेर पोलिसांना माहिती दिली. त्यावरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास जामनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नजीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार पांडुरंग पाटील व अशोक पाटील करीत आहेत.

Web Title: Suicide by the victim's throat