आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील पाच मुलींच्या लग्नाचा खर्च उचलणार
By Admin | Updated: January 11, 2017 00:49 IST2017-01-11T00:49:56+5:302017-01-11T00:49:56+5:30
जळगाव : जिल्ह्यातील पाच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलींच्या लग्नासाठी भरारी फाउंडेशन प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत करणार आहे.

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील पाच मुलींच्या लग्नाचा खर्च उचलणार
जळगाव : जिल्ह्यातील पाच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलींच्या लग्नासाठी भरारी फाउंडेशन प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत करणार आहे. तसेच सामूहिक विवाह सोहळ्य़ात संबंधित मुलींचे लग्न लावून त्यांना संसारोपयोगी साहित्य उपलब्ध करून देण्याचा प्रयत्नही फाउंडेशन करणार आहे.
मंगळवारी भरारी फाउंडेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच मदत जाहीर केलेल्या दोन आत्महत्याग्रस्त कुटुंबातील दोन मुलींनी ‘लोकमत’च्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलातील शहर कार्यालयास भेट दिली. आत्महत्याग्रस्त कुटुंबांसाठी आगामी काळात काय उपक्रम घेतले जातील याची माहिती फाउंडेशनच्या पदाधिका:यांनी दिली.
सपनाबाई लक्ष्मण पवार रा.तर्डी ता.पारोळा, मुस्कान मुबारक तडवी रा.किनगाव ता.यावल, कल्पना बलदेवसिंग राजपूत रा.चाळीसगाव, अरुणाबाई त्र्यंबक पाटील रा.अमळनेर या मुली व लक्ष्मीबाई लक्ष्मण बंजारा रा.भाटपुरा ता.शिरपूर यांच्या मुलीच्या लग्नासाठी फाउंडेशन 50 हजार रुपये मदत देणार आहे.
सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यासाठी लोकसहभाग वाढल्यास मदतीचे स्वरूप आणखी व्यापक करू, असे फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक परदेशी यांनी सांगितले. या वेळी भरारी फाउंडेशनचे रितेश लिमडा, सागर पगारिया, योगेश सुतार, योगेश हिवळकर, चाणक्य जोशी, विक्रांत चौधरी, गणेश नाईक, मुग्धा कुळकर्णी, नेहा बोरसे, प्रमोद बागडे, अमेय जोशी उपस्थित होते.
82 मुलांना घेतले दत्तक
फाउंडेशनने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील 82 मुलांना दत्तक घेतले असून, त्यांच्या शिक्षणासाठी खर्च केला जात आहे. तसेच सावखेडा ता.यावल येथील एका आत्महत्याग्रस्त शेतक:याच्या मुलीचे लग्न यापूर्वीच पार पडले आहे.
वसतिगृह व रोजगारासाठी प्रयत्न
या मुलामुलींसाठी लोक सहभागातून वसतिगृह उभारण्याचा प्रयत्न असून, संबंधित मुले व मुलींना रोजगारक्षम बनविण्यासाठीही काम केले जाणार आहे, असा मनोदय दीपक परदेशी यांनी व्यक्त केला.