खिर्डीच्या इसमाची रेल्वेखाली आत्महत्या
By Admin | Updated: June 28, 2017 13:08 IST2017-06-28T13:08:11+5:302017-06-28T13:08:11+5:30
रावेर तालुक्यातील खिर्डी येथील रहिवासी आनंदा बाजीराव कोचुरे (वय 38) या इसमाने धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केली.

खिर्डीच्या इसमाची रेल्वेखाली आत्महत्या
ऑनलाईन लोकमत
ऐनपूर,दि.28-रावेर तालुक्यातील खिर्डी येथील रहिवासी आनंदा बाजीराव कोचुरे (वय 38) या इसमाने धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सकाळी 8 वा.रेंभोटा रेल्वे पुलाजवळ घडली.
रेंभोटा रेल्वे पुलाजवळ कुणातरी अज्ञात इसमाचा मृतदेह असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांना दिली. त्यानुसार पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मयताच्या खिशातील कागदपत्रे तसेच वर्णनाच्या आधारावर पोलिसांनी ओळख पटविली. या प्रकरणी पुढील कार्यवाही सुरु आहे.