दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या
By Admin | Updated: August 13, 2015 02:28 IST2015-08-13T02:28:13+5:302015-08-13T02:28:13+5:30
नापिकी व कर्जाला कंटाळून जळगाव आणि गडचिरोली जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांनी शेतातच आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या.
दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या
जळगाव/गडचिरोली : नापिकी व कर्जाला कंटाळून जळगाव आणि गडचिरोली जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांनी शेतातच आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या. समाधान नारायण पाटील (३७, रा. उमरे ता.एरंडोल) याने मंगळवारी शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. तसेच गडचिरोलीतील कुरखेडा तालुक्यातील जांभळी (कढोली) येथील भाग्यवान सुरेश बागडे (१८) याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.