माहेजी येथील तरुणाची विष प्राशन करुन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 16:44 IST2017-11-25T16:33:50+5:302017-11-25T16:44:22+5:30
शहरातील खासगी कंपनीत कामाला असलेल्या अनिल विश्वनाथ पाटील (वय २९, रा.अयोध्या नगर, जळगाव मुळ रा.माहेजी, ता.पाचोरा) या तरुणाने शुक्रवारी रात्री माहेजी शिवारातच विष प्राशन करुन आत्महत्या केली. अनिल याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

माहेजी येथील तरुणाची विष प्राशन करुन आत्महत्या
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,२५: शहरातील खासगी कंपनीत कामाला असलेल्या अनिल विश्वनाथ पाटील (वय २९, रा.अयोध्या नगर, जळगाव मुळ रा.माहेजी, ता.पाचोरा) या तरुणाने शुक्रवारी रात्री माहेजी शिवारातच विष प्राशन करुन आत्महत्या केली. अनिल याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
अनिल हा अविवाहित असून जळगावात एका प्लास्टीक कंपनीत कामाला होता. अयोध्या नगरात तो वास्तव्याला होता. सुटी काढून तो नुकताच गावाला गेला होता. शुक्रवारी रात्री दहा वाजता त्याने माहेजी शिवारात विष घेतले. शनिवारी त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला होता. कॉन्स्टेबल समाधान पाटील यांनी पंचनामा करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.