जळगावात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

By Admin | Updated: June 10, 2017 18:02 IST2017-06-10T18:02:17+5:302017-06-10T18:02:17+5:30

तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना

Suicide by taking a youthful rape in Jalgaon | जळगावात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

जळगावात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 10 -  सकाळीच दारु पिवून आला का? अशा शब्दात वडील रागावल्याने तुषार अर्जुन सोनार (वय 23 रा.जागृती सोसायटी, जळगाव) या तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी दहा वाजता रामानंद नगरातील जागृती सोसायटीत घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, आठवडाभरापासून नळांना पाणी आलेले नव्हते.शनिवारी जागृती सोसायटीत नळाला पाणी आल्याने अजरुन सोनार यांचे कुटुंब पाणी भरत असताना सोनार यांनी मुलगा तुषार याला दुकानावरुन टूथपेस्ट घेवून येण्यास सांगितले. येताना तो दारु पिवून आल्याचे पाहून वडिलांनी तु इतक्या सकाळी पिवून आला का? असे विचारले. त्यानंतर तो सरळ वरच्या मजल्यावर गेला. पाणी भरणे झाल्यानंतर तुषारला यायला का वेळ लागतो आहे म्हणून वडील त्याला पाहण्यासाठी गेले असता आतून दरवाजा बंद होता व तो त्यांनी दिलेल्या हाकेलाही प्रतिसाद देत नव्हता. खिडकीतून डोकावून पाहिले असता तुषार याने दोरीने गळफास घेतल्याचे दिसून आले.

Web Title: Suicide by taking a youthful rape in Jalgaon