जळगावात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

By Admin | Updated: April 24, 2017 17:30 IST2017-04-24T17:15:01+5:302017-04-24T17:30:44+5:30

शंकरअप्पा नगरातील रहिवासी अक्षय मधुकर वायकोळे (22) या तरुणाने सोमवारी दुपारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

Suicide by taking a youthful rape in Jalgaon | जळगावात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

जळगावात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

 जळगाव,दि.24- शहरातील शंकरअप्पा नगरातील रहिवासी अक्षय मधुकर वायकोळे (22) या तरुणाने सोमवारी दुपारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही. 

अक्षय हा नाथ प्लाझा परिसरात खाद्यपदार्थाची हातगाडी लावून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित असे. सोमवारी त्याची आई व भाऊ घरात असताना मागच्या खोलीत जाऊन अक्षयने गळफास घेतला. बराचवेळ झाला तरी अक्षय या खोलीतून बाहेर कसा येत नाही म्हणून त्याच्या भावाने जावून पाहिले असता तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. 

Web Title: Suicide by taking a youthful rape in Jalgaon