वीज कंपनीतील लिपीकाची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 17:40 IST2017-09-06T17:39:51+5:302017-09-06T17:40:24+5:30
पाचोरा येथील घटनेत आत्महत्येचे कारण झाले नाही स्पष्ट

वीज कंपनीतील लिपीकाची गळफास घेऊन आत्महत्या
ऑनलाईन लोकमत
पाचोरा, दि.6 - वीज वितरण कंपनीतील वरिष्ठ लिपीकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 5 रोजी रात्री घडली. आसाराम पोसला पाडवी (वय 55) असे मयताचे नाव आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
आसाराम पाडवी हे पाचोरा येथील गाडगेबाबा नगरात भाडय़ाच्या घरात राहतात. ते मूळचे नंदुरबार येथील असून परिवार तेथेच आहे. आत्महत्येची बाब 6 रोजी सकाळी शेजारच्यांच्या लक्षात आली. पवन चनाडे यांच्या खबरीवरून पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.