जळगावात निवृत्त प्राध्यापकाची गळफास घेऊन आत्महत्या
By Admin | Updated: June 5, 2017 16:12 IST2017-06-05T16:12:32+5:302017-06-05T16:12:32+5:30
अकोला येथील कृषी महाविद्यालयातून निवृत्त झालेले प्रा.गोपाळ जगताप (वय 75, रा.जीवनमोती सोसायटी, मोहाडी रोड, जळगाव) यांनी राहत्या घरात लुंगीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली.

जळगावात निवृत्त प्राध्यापकाची गळफास घेऊन आत्महत्या
ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.5 : अकोला येथील कृषी महाविद्यालयातून निवृत्त झालेले प्रा.गोपाळ एकनाथ जगताप (वय 75, रा.जीवनमोती सोसायटी, मोहाडी रोड, जळगाव) यांनी राहत्या घरात लुंगीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी साडे सहा वाजता उघडकीस आली. आजाराला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.
जगताप व त्यांची नात दररोज सकाळी मॉर्निग वॉकसाठी जात असत. सोमवारी त्यांना का उशिर झाला म्हणून नात बघायला गेली असता जिन्यात लुंगीने गळफास घेतल्याचे दिसून आले. मुलगा दिनेश जगताप यांच्या माहितीवरुन एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जगताप यांच्या प}ीने वर्षभरापूर्वीच निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात दोन मुले, सूना व नातवंडे असा परिवार आहे.