रावेर तालुक्यातील विवरे बुद्रूक येथे एकाची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 17:00 IST2019-03-02T16:58:32+5:302019-03-02T17:00:17+5:30
विवरे बुद्रूक येथे पंडित सोमा गाढे (वय ६०) या इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली.

रावेर तालुक्यातील विवरे बुद्रूक येथे एकाची गळफास घेऊन आत्महत्या
ठळक मुद्देतीन दिवसातील आत्महत्येची दुसरी घटनाआत्महत्येचे कारण अज्ञात
विवरे बुद्रूक, ता.रावेर, जि.जळगाव : येथे पंडित सोमा गाढे (वय ६०) या इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली. २ रोजी सकाळी ८.४५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. राहत्या घराच्या आडोशात ताराच्या कडीला दोर लावून त्यांनी आपली जीवनयात्रा संपविली.
तीन दिवसातील आत्महत्येची ही दुसरी घटना घडली आहे. यामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत पंकज अनिल मोरे (वय २५, रा.विवरे बुद्रूक) याने माहिती दिली. त्यावरून निंभोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वर चौधरी करीत आहे.