तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:29 IST2020-12-03T04:29:00+5:302020-12-03T04:29:00+5:30
पारोळा शहरातील बागवान गल्ली येथील रहिवासी असलेला मोसिन खान अब्दुल करीम खान (२२) या तरुणाने मंगळवारी दुपारी तीन वाजताच्या ...

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
पारोळा शहरातील बागवान गल्ली येथील रहिवासी असलेला मोसिन खान अब्दुल करीम खान (२२) या तरुणाने मंगळवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
पारोळा शहरातील बागवान गल्लीतील रहिवासी असलेला मोसिन खान हा दुपारी तीन वाजताच्या सुमारास आपल्या राहत्या घरी एकटा होता. त्याने घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. याबाबत इमरान खान अब्दुल करीम खान यांनी फिर्याद दिल्यावरून पारोळा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकाँ किशोर पाटील करीत आहेत.
Attachments area