जावयाची गळफास लावून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:20 IST2021-06-09T04:20:17+5:302021-06-09T04:20:17+5:30

पुरुषोत्तम कुमावत यांचा जावई हरीश कौतिक कुमावत (हिवरखेडा दिगर) येथे वास्तव्यास होता. व्यवसायाने बांधकाम व्यावसायिक होता व दारूचे व्यसन ...

Suicide by strangulation | जावयाची गळफास लावून आत्महत्या

जावयाची गळफास लावून आत्महत्या

पुरुषोत्तम कुमावत यांचा जावई हरीश कौतिक कुमावत (हिवरखेडा दिगर) येथे वास्तव्यास होता. व्यवसायाने बांधकाम व्यावसायिक होता व दारूचे व्यसन होते. पत्नीला रविवारी रात्री वडिलांकडे झोपण्यासाठी पाठविले आणि एकटाच घरात झोपला. सोमवारी सकाळी पत्नी आपल्या घरी गेली असता पती हरीश दरवाजा उघडत नाही व आवाज दिल्यावरही प्रतिसाद मिळत नाही. म्हणून, वडील पुरुषोत्तम कुमावत व राजू कुमावत यांना बोलावले. त्यांनी घराचा पत्रा उचकून पाहिले असता हरीश याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.

गावातील नागरिकांच्या साहाय्याने हरीशला घटनास्थळावरून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप कुमावत यांनी तपासणीअंती मृत घोषित केले. बादल पुरुषोत्तम कुमावत यांच्या खबरीवरून पहूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पश्चात पत्नी, मूल असा परिवार असून परिस्थिती हलाखीची आहे.

===Photopath===

070621\07jal_6_07062021_12.jpg

===Caption===

हरिष कुमावत 

Web Title: Suicide by strangulation