शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

पाच विषयात नापास झाल्याने जळगाव येथील तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 13:08 IST

पाच विषयात नापास झाल्याने शासकीय तंत्रनिकेतनचा प्रथम वर्षाचा विद्यार्थी साहिल राजू उर्फ उल्हास तडवी (वय १७, रा,लक्ष्मी नगर, संचारनगर, जळगाव) याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी साडे सहा वाजता उघडकीस आली. साहिल हा फक्त दोनच विषयात पास झाला आहे.

ठळक मुद्दे राहत्या घरातच घेतला गळफास फक्त दोनच विषयात पास लक्ष्मी नगर सुन्न

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,६ : पाच विषयात नापास झाल्याने शासकीय तंत्रनिकेतनचा प्रथम वर्षाचा विद्यार्थी साहिल राजू उर्फ उल्हास तडवी (वय १७, रा,लक्ष्मी नगर, संचारनगर, जळगाव) याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी साडे सहा वाजता उघडकीस आली. साहिल हा फक्त दोनच विषयात पास झाला आहे. दरम्यान, याबाबत एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.याबाबत सूत्रांनी दिलेली अशी की, साहिल हा शासकीय तंत्रनिकेतनला प्रथम वर्षाच्या द्वीतीय सत्राला शिक्षण घेत होता. या परिक्षेचा आॅनलाईन निकाल मंगळवारी रात्री बारा वाजता जाहीर झाला. कुटुंबासोबत जेवण झाल्यानंतर साहिल हा वरच्या मजल्यावर झोपायला गेला. रात्री बारा वाजता त्याने आॅनलाईन निकाल पाहिला असता फक्त दोनच विषयात पास व पाच विषयात नापास झाल्याने त्याला जबर धक्का बसला. तणावात येवून त्याने रात्रीच गळफास घेतला. सकाळी साडे सहा वाजता लहान भाऊ समीर हा त्याला उठविण्यासाठी गेला असता आतून दरवाजा बंद होता, प्रतिसाद मिळत नसल्याने समीरने खिडकीतून पाहिले असता त्याने गळफास घेतला होता घाबरलेल्या समीरने तातडीने खाली आई, वडीलांना हा प्रकार सांगितला. गळफास घेतलेल्या अवस्थेत मुलाला पाहताच आई, वडीलांना हंबरडा फोडला.

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा