पिंप्राळा हुडकोत विवाहितेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:32 IST2020-12-12T04:32:29+5:302020-12-12T04:32:29+5:30

जळगाव : पिंप्राळा हुडको येथील सुवर्णा आनंदा चौधरी (वय ३५) या विवाहितेने मध्यरात्री घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा ...

Suicide of a married woman in Pimpri-Chinchwad | पिंप्राळा हुडकोत विवाहितेची आत्महत्या

पिंप्राळा हुडकोत विवाहितेची आत्महत्या

जळगाव : पिंप्राळा हुडको येथील सुवर्णा आनंदा चौधरी (वय ३५) या विवाहितेने मध्यरात्री घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार शुक्रवारी (दि.११) सकाळी उघडकीस आला आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंदा श्रावण चौधरी हे पत्नी सुवर्णा, आई इंदूबाई चौधरी आणि दोन मुलांसह राहतात. आनंदा चौधरी हे व्यवसायाच्या निमित्ताने धुळे येथे कामासाठी गेले होते. घरी पत्नी सुवर्णा आणि आई इंदूबाई हे दोघेच होते. सुवर्णा चौधरी यांनी सर्वजण झोपले असताना दोरीने छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार सकाळी इंदूबाई यांच्या लक्षात आला. घटनेची माहिती मिळताच रामानंदनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी, कॉन्स्टेबल सुनील पाटील, रेवानंद साळुंखे यांनी घटनास्थळ गाठले. घटनेचा पंचनामा करून मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. याठिकाणी शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Web Title: Suicide of a married woman in Pimpri-Chinchwad