पहूर येथे तरुणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 16:25 IST2019-10-30T16:24:25+5:302019-10-30T16:25:30+5:30
पहूर,ता.जामनेर : लेलेनगर भागातील रहिवासी दिलीप यादव कुमावत (३८) या विवाहित युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री ...

पहूर येथे तरुणाची आत्महत्या
पहूर,ता.जामनेर : लेलेनगर भागातील रहिवासी दिलीप यादव कुमावत (३८) या विवाहित युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. या प्रकरणी पहूर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिलीप यादव कुमावत याने राहत्या घरात गळफास लावून घेतल्याचे निदर्शनास आले. त्याचे शवविच्छेदन जामनेर उपजिल्हा रुग्णालयात मंगळवारी करून दुपारी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. पश्चात पत्नी, दोन मुले, आई असा परिवार असून आत्महत्येमागचे कारण समजले नाही.