विवरे येथे तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 19:54 IST2020-05-15T19:50:31+5:302020-05-15T19:54:49+5:30
विवरे बुद्रूक येथील भरत श्रावण महाजन या तरूणाने आत्महत्या केली.

विवरे येथे तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या
ठळक मुद्देतरुण अविवाहित आत्महत्येचे कारण अज्ञात
विवरे, ता.रावेर, जि.जळगाव : विवरे बुद्रूक येथील रहिवाशी भरत श्रावण महाजन वय (२६) या अविवाहीत तरूणाने आत्महत्या केली. ही घटना १५ रोजी सकाळी साडेसहाला उघडकीस आली.
दिलीप शांताराम बेंडाळे यांच्या शेत गट नंबर १०५३ मध्ये जामुनाच्या झाडाच्या फांदीला रुमालाच्या सहाय्याने गळफास घेतला. दिलीप बेंडाळे यांनी निंभोरा पोलिसांना माहिती दिली. त्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रावेर ग्रामीण रुगणालयात डॉ.एन.डी.महाजन यांनी शवविच्छेदन केले. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. पुढील तपास स.पो.नि.महेश जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.काँ .विकास कोल्हे करीत आहे.