तरुण शेतकऱ्याची कर्जामुळे आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 21:13 IST2019-10-31T21:13:22+5:302019-10-31T21:13:34+5:30
शिंदाडची घटना : विहिरीत आढळला मृतदेह

तरुण शेतकऱ्याची कर्जामुळे आत्महत्या
शिंदाड, ता. पाचोरा : कर्जास कंटाळून तसचे अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झाल्याने ज्ञानेश्वर माधवराव सावळे (वय २५) या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना येथे घडली.
याबाबत माहिती अशी की, ज्ञानेश्वर माधवराव सावळे रा. पहुरी ता. सोयगाव हा शेती कामासाठी शिंदाड ता. पाचोरा येथे राहत होता. त्याने शेती कसन्यासाठी घेतली होती. दरम्यान कर्ज व नुकसानीमुळे तो चिंताग्रस्त होता असे सांगितले जाते. यामुळेच तो २९ रोजी रात्री कुणास न सांगता घरातून निघून गेला होता. याबाबत पिंपळगाव हेरे पोलीस स्टेशनमध्ये ३० रोजी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र ३१ रोजी दुपारी गहुले रस्त्यावरील शेतात त्याचा मृतदेह आढळून आला.याबाबत पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.