कुंझर येथील कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2019 23:07 IST2019-09-29T23:07:16+5:302019-09-29T23:07:20+5:30
चाळीसगाव : तालुक्यातील कुंझर येथील भगवान त्र्यंबक पाटील (वय ६२) या शेतकºयाने कर्ज बाजाराला कंटाळून २९ रोजी दुपारी कपाशीच्या ...

कुंझर येथील कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या
चाळीसगाव : तालुक्यातील कुंझर येथील भगवान त्र्यंबक पाटील (वय ६२) या शेतकºयाने कर्ज बाजाराला कंटाळून २९ रोजी दुपारी कपाशीच्या शेतात फवरणीचे औषध घेऊन आत्महत्या केली.
भगवान पाटील यांच्यावर वि.का. सोसायटी व खासगी सावकारांचे तीन ते चार लाख रुपयांचे कर्ज होते. या कर्जाला कंटाळून त्यांनी विषारी पदार्थ सेवन केल्याने त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. मेहुणबारे पोलिस स्टेशनला सुनील कल्याण पाटील यांनी खबर दिली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.