पिंप्री येथील विवाहितेची पेटवून घेत आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 22:56 IST2018-09-30T22:54:41+5:302018-09-30T22:56:35+5:30
पिंप्री येथील नवविवाहिता शबीनाबी शेख जावेद (२१) हिने टॉयलेट मध्ये अंगावर डिझेल टाकून स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या केल्याची घटना ३० रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली.

पिंप्री येथील विवाहितेची पेटवून घेत आत्महत्या
धरणगाव / पिंप्री : तालुक्यातील पिंप्री येथील नवविवाहिता शबीनाबी शेख जावेद (२१) हिने टॉयलेट मध्ये अंगावर डिझेल टाकून स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या केल्याची घटना ३० रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली.
भडगाव तालुक्यातील पिंपरखेड येथील माहेरवाशिन असलेल्या मयत शबीनाबी (वय २१) यांचे शे.जावेद शेख यांच्यासोबत पाच महिन्यापूर्वीच लग्न झाले होते. ते रिक्षा चालक असून पाच महिन्यापासून त्यांच्या गुण्यागोविंदाने संसार सुरु होता. रविवार ३० रोजी टॉयलेट मध्ये डिझेलचा डबा घेवून जाऊन तिने स्व:ताला पेटवून घेतले. या घटनेत तिचा जागेवरच मृत्यू झाला. आत्महत्येचे कारण अजून समोर आलेले नाही. या प्रकरणी शे.मुक्तार शे.बशीर यांनी दिलेल्या खबरीवरुन धरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड हे करीत आहे. मयत शबीनाबी यांच्यावर १ रोजी अंत्यसंस्कार केले जाणार आहे.