विषप्रशान करून दापोरी येथील एकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 21:39 IST2019-10-12T21:39:25+5:302019-10-12T21:39:33+5:30
एरंडोल : तालुक्यातील दापोरी येथे बापू दगडू मराठे (वय ४०) यांनी राहत्या घरात विषप्रशान करून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी ...

विषप्रशान करून दापोरी येथील एकाची आत्महत्या
एरंडोल : तालुक्यातील दापोरी येथे बापू दगडू मराठे (वय ४०) यांनी राहत्या घरात विषप्रशान करून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही.
मराठे यांनी विषप्रशान केल्याचे समजताच कुटुंबीयांनी ग्रामस्थांनी त्यांना जळगाव सामान्य रुग्णालयात हलविण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथे नेत असताना तब्येत अत्यवस्थ झाल्याने माघारी फिरून एरंडोल ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. डॉ.कैलास पाटील यांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनाला अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. भीमराव मोरे, निलेश ब्राह्मणकर, शिवाजी पाटील, श्रीराम पाटील हे तपास करीत आहेत.