शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

रामेश्वर कॉलनीत दहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 11:17 IST

कारण अस्पष्ट : घरमालकाच्या रिकाम्या खोलीत घेतला गळफास

जळगाव : रामेश्वर कॉलनीत योगिता लिलाधर जयकर (१५, रा.स्वामी समर्थ मंदिराजवळ) या मुलीने घराशेजारील रिकाम्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी ७.३० वाजता उघडकीस आली. दरम्यान, योगिता हिने आत्महत्या का? केली याचे कारण स्पष्ट झालेले नाही. योगिता ही यंदा दहावीला गेली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री योगिता हिने कुटुंबासोबत जेवण केले. त्यानंतर सर्व जण झोपले, पहाटेच्या सुमारास उठून ती घराशेजारीच घरमालकाच्या एका रिकाम्या खोलीत गेली व तेथे तिने साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी ७.३० कुटुंब झोपेतून उठले असता योगिता घरात नव्हती. शेजारी जावून पाहिले असता शेजारच्या खोलीत ती गळफास घेतल्याच्या अवस्थेत दिसली.आईने फोडला हंबरडायोगिताने गळफास घेतल्याचे दिसताच आईने हंबरडा फोडला. त्यामुळे कुटुंब धावून आले. त्यांनी भाऊ व इतर नातेवाईकांना घटनेची माहिती दिली. शेजाऱ्यांनी योगिता हिला खाली उतरवून रिक्षातून दोन रुग्णालयांमध्ये नेले. तत्पूर्वी तिचा मृत्यू झालेला होता. योगिता हीच्या वडीलांचे निधन झालेले आहे. ती आई, बहिण व भाऊ यांच्यासोबत राहत होती. रामेश्वर कॉलनीतील विद्यालयात ती शिक्षण घेत होती. उपनिरीक्षक संदीप पाटील व कॉ.विश्वजित सोनवणे यांनी मृतदेहाचा पंचनामा केला. घटनास्थळी चिठ्ठी वगैरे काहीच नव्हते. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास उपनिरीक्षक संदीप पाटील करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव