शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेला धक्का, पाच उमेदवारी अर्ज बाद; एबी फॉर्मवर खाडाखोड, झेरॉक्स जोडल्याने ठरले अवैध
2
बांगलादेशी खेळाडूंसाठी आयपीएलचे दरवाजे बंद होणार? मुस्तफिजुर रहमानसाठी शाहरुखच्या संघाने ९ कोटी मोजले...
3
टॅरिफमुळे US ची किती कमाई? "टीका करणारे मुर्ख" असं म्हणणारे ट्रम्प प्रत्येकाला $२००० देण्याचं वचन पूर्ण करणार का?
4
२०२६ मध्ये या ५ राज्यात रंगणार सत्तेचा सारीपाट, बाजी कोण मारणार, NDA की ‘INDIA’?
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचे पडसाद! 'या' दोन देशांनी अमेरिकन नागरिकांच्या प्रवेशावर घातली बंदी
6
जळगावात भाजपाला धक्का, माजी महापौरांचा अर्ज बाद; AB फॉर्ममधील त्रुटीचा उद्धवसेनेलाही फटका
7
Healthy Diet: अन्न तेच पण पद्धत वेगळी! जपानी लोक लठ्ठ का होत नाहीत? त्यामागे आहेत ५ सिक्रेट 
8
कोकण गाजवल्यावर शिंदेचा फायर ब्रँड नेता मुंबईत; ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात दिली मोठी जबाबदारी
9
“आम्ही दोघं राजा-राणी…” विरुष्काचं प्रेम अन् MS धोनी–साक्षीची ‘राजकुमारी’सोबतची खास फ्रेम चर्चेत
10
भारताची चीनवर कडी...! 'या' उत्पादनातही मागे टाकलं; ड्रॅगनची चिंता वाढली
11
Nashik Municipal Corporation Election : डबल एबी फॉर्म अन् बडगुजरांचा ट्रिपल धमाका; आमदार सीमा हिरेंसह भाजपला धक्का
12
'ठाकरे बंधूंचा वचननामा ४ जानेवारीला प्रसिद्ध करणार, नंतर एवढ्या संयुक्त सभा होणार', संजय राऊत यांनी दिली माहिती 
13
उड्डाणापूर्वी एअर इंडियाचा पायलट दारू प्यायला; अधिकाऱ्यांनी घेतले ताब्यात, DGCA कारवाई करणार
14
रवींद्र चव्हाणांनी शब्द दिला, १०० टक्के भाजपाचं तिकीट तुम्हालाच, मग अचानक रात्री काय घडलं?
15
AI मुळे नोकऱ्या जाणार का? आनंद महिंद्रा यांनी मांडले 'ब्रेन गेन'चे सूत्र; नव्या वर्षात युवकांना दिला यशाचा मंत्र
16
Switzerland Blast: स्वित्झर्लंड हादरलं! न्यू इयर सेलिब्रेशन सुरू असतानाच रिसॉर्टमध्ये भीषण स्फोट; अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
17
'AB फॉर्म'चा झोल केला! भाजपच्या बंडखोर उमेदवाराने पक्षालाच गंडवलं, अमित साटमांचे थेट अधिकाऱ्यालाच पत्र
18
Nashik Municipal Corporation Election : AB फॉर्मच्या घोळात भाजपचे चार अधिकृत झाले अनधिकृत; शहाणे, ढोमसे, पवार, नेरकर गोत्यात
19
ठाण्यात मनसे, उद्धवसेनेचे दोन उमेदवार निवडणुकीतून बाहेर! अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप, कोणाचे अर्ज झाले रद्द? 
20
'हा देश सर्वांचा; धर्म, जात, भाषा आणि प्रदेशाच्या आधारे भेदभाव होऊ नये'- मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

महिंदळे येथील सुदाम परदेशी बनले ठाण्याचे उपजिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 12:19 IST

भडगाव तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

प्रमोद ललवाणी

कजगाव, ता.भडगाव, जि. जळगाव : महिंदळे, ता. भडगाव येथे शेतकरी कुटुंबातील सुदाम परदेशी आता ठाणे येथील उपजिल्हाधिकारी बनले आहेत. परदेशी यांच्या नियुक्तीने भडगाव तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.एमबीबीएस करून डॉक्टर बनून ग्रामीण भागात जनतेची सेवा करावी, ही प्राजल भावना मनाशी होती, मात्र एमबीबीएसला प्रवेश न मिळाल्याने राहुरी येथे बी. टेक. (कृषी अभियांत्रिकी) चे शिक्षण घेतले. नंतर मन राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेकडे वळले.१९९५ मध्ये मंत्रालय सहाय्यक १९९६ विशेष लेखा अधिकारी १९९६ उपअधीक्षक, भूमि अभिलेख, १९९७ मध्ये तहसीलदार अशा पध्दतीने दोन वर्षात वेगवेगळ्या परीक्षातून निवड झाल्या. १९९८ मध्ये तहसीलदार या पदावर पुणे महसूल विभागात सुदाम परदेशी रुजू झाले. जुन्नर, कराड, दौंड येथे तहसीलदार म्हणून कार्यकाळ पूर्ण केला. सन २००४/५ मध्ये कृष्णा कोयना नद्यांना आलेली पूरस्थिती, तद्नंतरची मदत या सर्व कामात उत्कृष्ट काम केल्याने उत्कृष्ट तहसीलदार म्हणून गौरविण्यात आले. २००८ मध्ये पदोन्नती होत विशेष भूसंपादन अधिकारी (उल्लास खोरे प्रकल्प) प्रसंगी भूसंपादनचे काम वेळेत पूर्ण केले. तद्नंतर उपविभागीय अधिकारी पनवेल, ठाणे येथे काम पाहिले. सन २०१७ / १८ या वर्षासाठी उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी म्हणून ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गौरविण्यात आलेअशा पदोन्नतीने १३ सप्टेंबर रोजी ठाणे जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी या पदावर नियुक्ती करण्यात आली.ही वार्ता भडगाव तालुक्यात पोहचताच आनंदोस्तव साजरा करण्यात आला.सुदाम परदेशी हे भडगावचे माजी नगराध्यक्ष तथा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गणेश परदेशी यांचे सख्खे चुलत बंधू आहेत.

टॅग्स :GovernmentसरकारBhadgaon भडगाव