कजगावच्या भिल्ल तरुणाचा असाही प्रामाणिकपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:18 IST2021-09-24T04:18:15+5:302021-09-24T04:18:15+5:30

कजगाव भिल्लवस्तीतील आदिवासी तरुण नीलेश अनिल भिल्ल हा मजुरीकरिता वाडे येथे गेला होता. मजुरीचे काम संपल्यानंतर सायंकाळी ...

Such sincerity of the Bhil youth of Kajgaon | कजगावच्या भिल्ल तरुणाचा असाही प्रामाणिकपणा

कजगावच्या भिल्ल तरुणाचा असाही प्रामाणिकपणा

कजगाव भिल्लवस्तीतील आदिवासी तरुण नीलेश अनिल भिल्ल हा मजुरीकरिता वाडे येथे गेला होता. मजुरीचे काम संपल्यानंतर सायंकाळी कजगावी घरी परत येत असताना त्याला वाडे-कजगाव रस्त्यादरम्यान माथ्यावरच्या रस्त्यावर एक पाकीट आढळले.

नीलेश भिल्ल याने पाकीट पाहिले असता पाकिटात राष्ट्रीयीकृत बँकेचे एटीएमकार्ड, पॅनकार्ड, क्रेडिटकार्ड, आधारकार्ड तसेच साडेतीन हजार रोख रक्कम आढळली. सामाजिक कार्यकर्ते विजय गायकवाड यांनी वाडे येथे याबाबत अशोक परदेशी यांच्याशी संपर्क साधून कळविले. नंदलाल मिस्तरी याला कळविण्यात आले.

नीलेश भिल्ल व त्याचे काका विजय वसंत गायकवाड (भिल्ल) यांनी हे पाकीट कजगाव पोलीस स्टेशनला दिले. हे पाकीट वाडे येथील रहिवासी भडगाव येथे लॅब असिस्टंट नंदलाल गोकुळ मिस्तरी या कर्मचाऱ्याचे होते. त्यांना ते पाकीट पोलीस कर्मचाऱ्यांसह नागरिकांच्या उपस्थितीत प्रामाणिकपणे परत करण्यात आले.

यावेळी कजगाव पोलीस स्टेशनचे सहायक फौजदार छबुलाल नागरे व पोलीस काॅन्स्टेबल विजय गवळी आदी उपस्थित होते. यावेळी नंदलाल मिस्तरी यांनी नीलेश भिल्ल, विजय भिल्ल यांचा सत्कार केला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते बालू सोनवणे, विजय गायकवाड, मालचे, भास्कर ठाकरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

230921\23jal_1_23092021_12.jpg

 कजगाव येथील निलेश भिल्ल यांचा सत्कार करताना नंदलाल मिस्तरी. उपस्थित विजय गायकवाड, पोलीस कर्मचारी.

Web Title: Such sincerity of the Bhil youth of Kajgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.