शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
2
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
3
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
4
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
5
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
6
तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्... 
7
देवीच्या भंडाऱ्याला गेलेला तो चिमुकला पुन्हा परतलाच नाही; २० फूट नाल्यात पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
8
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
9
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
10
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
11
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
12
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
13
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
14
ठाणे जिल्ह्यात पुरामुळे  हजाराे नागरिकांचे ठिकठिकाणी स्थलांतर; शनिवार, रविवारी पावसाने  दिवसभर झोडपून काढले
15
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
16
स्वयंपाकघर ते मंत्रालय : ‘विदेशी’ असेल ते हाकला! बलाढ्यांशी टक्कर द्यायला स्वदेशी २.० आंदोलन
17
अतिवृष्टीमुळे शेतमाल सडला; तुटवड्यामुळे मिरचीचे दर दुप्पट
18
पाकिस्तानचे शेपूट किती वेळा नळीत घालून बघायचे?
19
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
20
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

असे ‘मामा’ यापुढे पुन्हा होणे नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 00:25 IST

भय्यूजी महाराजांच्या ‘भाची’ला आठवणींचा हुंदका : महाराज खान्देशी खाद्य पदार्थांचे चाहते

ठळक मुद्देभय्यूजी महाराज हे चाळीसगावी आल्यानंतर श्यामल जाधव यांच्याकडे जेवणात खान्देशी मेनू असायचा. थालीपिठ, मिरचीचा ठेचा, वांग्याची भाजी, पिठलं आणि भाकरी असे खान्देशी खाद्यपदार्थ ते आवडीने खात.श्याम जाधव यांनी ‘सूर्र्याेदय’ अध्यात्मिक परिवारातर्फे चाळीसगाव तालुक्यात वेगवेगळे उपक्रम राबविले. अमळनेर येथे महाराजांनी आयोजित केलेल्या सामूहिक विवाह सोहळ्यात चाळीसगाव तालुक्यातील ५१ जोडप्यांचे विवाह अवघ्या सव्वा रुपयात महाराजांच्या ट्रस्टमार्फत झाले.३ जून रोजी श्यामल जाधव यांच्याशी भय्यूजी महाराज भ्रमणध्वनीवरुन बोलले. हा मामा आणि भाची यांच्यातला शेवटचा मोबाईल संवाद ठरला. ‘बरेच दिवस झाले. चाळीसगावला फेरी झाली नाही. श्यामल मी येतोय, लवकरच तुुझ्याकडे चाळीसगावला,’ असं सांगताना श्यामल जाधव यांना गहिवरुन आ

जिजाबराव वाघ ।चाळीसगाव (जि.जळगाव) : ‘श्यामल मी औरंगाबादला चाललोय. वाटेत तुझ्या घरी जेवण घेईल. छान पिठलं आणि भाकरी बनव... ‘मामा भय्यूजी महाराजांचा फोनवरचा हा निरोप ऐकला की, सगळं घर आनंदून जायचं. आता पुन्हा असा फोन येणार नाही. भय्यूजी महाराजांच्या आठवणींचा बांध फुटला अन् श्यामल जाधव यांना हुंदका अनावर झाला. भय्यूजी महाराज आणि श्यामल जाधव यांचे मामा - भाची असं नातं. महाराजांच्या मृत्यूची बातमी ऐकून संपूर्ण जाधव कुटूंबिय सुन्न झाले आहे.चाळीसगावच्या हनुमानवाडीत राहणाऱ्या श्याम आणि श्यामल जाधव यांच्या कुटुंबाशी भय्यूजी महाराजांचे गेल्या अनेक वर्षापासून ऋणानुंबध आहेत.२५ ते ३० वेळा भय्यूजी महाराज चाळीसगावी आपल्या भाचीला भेटण्यासाठी येऊन गेले आहेत. विशेष म्हणजे मुक्काम करुन महाराजांनी येथे गप्पांच्या मैफीलीही रंगवल्या आहेत. चाळीसगावात त्यांच्या ‘सूर्योदय’ परिवाराचे ३०हून अधिक साधक आहेत. त्यांच्यामार्फत परिसरात अध्यात्मिक व सामाजिक उपक्रम सुरू असतात.सांगोल्यात झाली नाती घट्टभय्यूजी महाराज यांची एक बहिण विजयालक्ष्मी साळुंखे ह्या सांगोल्यात (जि.सोलापूर) राहतात. विजयालक्ष्मी ह्या श्यामल जाधव यांच्या सख्ख्या काकू. बालपणापणासूनच भय्यूजी महाराज सांगोल्यात बहिणीकडे येतं. श्यामल यांचा विवाह चाळीसगाव येथील श्याम जाधव यांच्याशी झाल्यानंतर भय्यूजी महाराज आवर्जून येथे यायचे. मराठवाड्यात जाताना चाळीसगाव येथे भाचीच्या हातचे जेवण घेतल्याशिवाय महाराजांचा पुढचा प्रवास सुरू होत नव्हता.भय्यूजी महाराज यांच्याशी आमचे नातेसंबंध असले तरी ते आमच्या परिवाराचे अध्यात्मिक गुरुही होते. त्यांच्या जाण्याने आम्हाला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या आठवणी तेवढ्या उरल्या आहेत- श्यामल व श्याम जाधव, चाळीसगाव. 

टॅग्स :relationshipरिलेशनशिपChalisgaonचाळीसगाव